गिताभाभींच्या झंझावाती प्रचाराने आ. पवारांचा ऑटोरिक्षा सुसाट निघाला
गेवराई प्रतिनिधी : ऐनवेळी कोणीही कुणाचा दारात जाऊन, स्वार्था साठी मताचा जोगावा मागतो. मात्र, आम्ही गेवराई च्या सेवेत सदैव तत्पर राहीलोत. हे नाते कायमचे आहे. त्याला तडा जाऊ दिला नाही. त्यामुळे, कठीण प्रसंगात गेवराई च्या महिलां माझ्या पाठिशी खंबीर उभ्या राहतील आणि आमदार लक्ष्मण आण्णांची ॲटो रिक्षा विधानसभेत घेऊन जातील, असा दृढ विश्वास सौ. गिताभाभी बाळराजे पवार यांनी येथे व्यक्त केला. दरम्यान,
महिलांच्या आरोग्यासाठी धडपड करणारी माऊलीने पून्हा एकदा पदर खोचून आ. लक्ष्मण पवारांच्या विजयासाठी डोअर टू डोअर जाऊन
झंझावाती प्रचाराला सुरूवात केली असून, शहरातील महिलांना दिलेल्या प्रतिसादाने आ. पवारांचा ऑटोरिक्षा सुसाट निघाला आहे.
गेल्या तीन दशकापासून शहरातील माय बाप जनतेने आमच्या कुटुंबावर विश्वास टाकलेला आहे. हे उपकार आमचे कुटुंब कधीच विसरणार नाही. गेवराई शहर आमचे घर असून येथील जनता ही आमची मायबाप असल्याचे समजून सेवा करत आहोत.
असे ही, सौ. पवार यांनी शहरातील प्रचार दौऱ्या प्रसंगी बोलताना केले. त्यांच्या या झंझावाती प्रचार दौऱ्याने आ.लक्ष्मण पवार यांची ऑटोरिक्षा सुसाट आहे.
गेवराई विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार आ.लक्ष्मण पवार यांच्या प्रचारार्थ त्यांनी शहरातील डोअर टू डोअर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी सांगितले की, बाळराजे पवार, आ.लक्ष्मण आण्णा पवार यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात केलेल्या दर्जेदार कामा मुळेच ग्रामीण भागातील जनतेने आ. पवार यांना विधानसभेला उभे रहावे, असा आग्रह केला होता. जनतेने 60 हजार मताच्या फरकाने त्यांना निवडून दिले, यांची जाणीव ठेवून आण्णांनी प्रमाणिक प्रयत्न करुन मतदारसंघातील प्रत्येक गावा गावात दर्जेदार रस्ते केले आहेत यांची मतदारसंघातील जनता साक्षीदार आसून त्यांना दुसऱ्यांदा ही या मतदार मायबाप जनतेने सेवा करण्याची संधी दिली आन त्यांनी दहा वर्षात या तालुक्याचा कायापालट केला. म्हणून येणाऱ्या 20 नोव्हेंबरला 15 क्रमांकाचे ऑटोरिक्षा या चिन्हा समोरील बटन दाबून मतदार आ. पवार यांना पुन्हा या मतदार संघाची सेवा करण्यांची संधी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सौ. गीताभाभी बाळराजे पवार यांच्या या झंझावाती प्रचाराने गेवराई शहरासह मतदार संघात आ.लक्ष्मण पवार यांची ऑटोरिक्षा सुसाट धावत असल्याचे दिसून येत आहे.
या प्रचार दौऱ्यात त्यांच्या समवेत आ.लक्ष्मण पवार यांच्या सुविद्य पत्नी भाग्यश्रीताई पवार, , याहीया खाॅन, दादासाहेब गिरी, ब्रम्हदेव धुरंधरे, आप्पासाहेब कानगुडे, राम पवार, संजय इंगळे, शिनुभाऊ बेद्रे, समाधान मस्के, रजीत खाजेकर, महादेव बेद्रे, राणा कानाडे, पप्पु काबंळे, किशोर काडेकर, लहुराव सावंत, नितीन कांडे, किरण गायकवाड, मुरलीधर सुतार, सुदाम चव्हाण, विठ्ठल धापसे, माऊली सुतार, बाळराजे थोरात, नवनाथ धुरंधरे, अनिल धापसे, हारी पंडीत, इमरान शेख, सादेक चाचु , संतोष सुतार, भुषण जोगदंड, पिंटु साळवे, दिपक अवघड, शिवाजी काळे, शेख शब्बीर, शेख ईर्शाद, शौकत पठाण, दाऊद पठाण, योगेश मोटे, पप्पु बांडे, संकेत पौळे, प्रकाश बर्डे, पिंटु बर्डे, अमोल हादगुले, अनिल खांडेकर, राजेंद्र तापडीया, शेख बाबा, आदि उपस्थित होते.