बीड प्रतिनिधी : बीडचे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ डॉ.दिपाताई क्षीरसागर यांनी कॉर्नर बैठकांचा धडाका लावला आहे. त्यांना प्रत्येक प्रभाग व वार्डावार्डातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या प्रचारादरम्यान त्यांनी काझी नगर, बाळराजे नगर, झमझम कॉलनी आदी परिसरात बैठका घेतल्या. डॉ.योगेश यांच्याकडे सकारात्मक कामाची दृष्टी आहे. त्यांनी कधीही गुंडगिरी किंवा गुंड प्रवृत्तीला थारा दिला नाही, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष डॉ.दिपाताई क्षीरसागर यांनी केले.
डॉ.दिपाताई क्षीरसागर म्हणाल्या, डॉ.योगेश हे उच्च विद्याविभूषित व्यक्तीमत्व असून त्यांच्याकडे विकासात्मक कामाची दृष्टी आहे. आजवर त्यांनी बीड विधानसभेच्या कार्यक्षेत्रात अनेक कामे केली. त्यामध्ये मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन, युवकांसाठी बेरोजगार मेळावे, वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन, गणेशोत्सव, शिवजयंती, दसरा-दांडिया महोत्सवाचे आयोजन यांसारख्या सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ग्रामीण आणि शहरी भागात विकास कसा होईल याकडेच लक्ष दिले. विकास हीच जात आणि विकास हाच धर्म या स्व.काकुंच्या शिकवणीनुसार डॉ.योगेश यांची वाटचाल सुरू आहे. आजवर अध्यक्षसाहेबांनी बीडच्या विकासासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून काम केले. आता त्यांच्या कार्याची धुरा योगेश यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. बीड विधानसभेच्या सर्वांगिण विकासासाठी आपल्याला डॉ.योगेश यांना विधानभवनात पाठवायचे आहे, असेही त्या म्हणाल्या. त्या महायुतीच्या योजनांविषयी सांगितले. लाडकी बहीण, मुलींना मोफत शिक्षण, महिलांना मोफत गॅस सिलिंडर, मोफत प्रवास, शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा सर्वांगिण विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे म्हणून या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकांना माजी नगरसेवक गणेश वाघमारे, शर्मा भाभी, काझी मुहम्मद साकीब, सोहेल, सय्यद झाकी, सादेक सिद्दिकी, हिना शेख, सय्यद फातेमा, झहिरा फातेमा, आशा वर्कर्स ग्रुप, धुतेकर, राजू, पुजारी आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.