धनंजय मुंडेंनी केलेली कामे व मदत लोक पदाधिकाऱ्यांना सांगू लागली
संपूर्ण शहर प्रचारफेरीतून पिंजून काढणार
परळी वैद्यनाथ – कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबतीला आता परळी शहरातील महायुतीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात उतरले असून आज सकाळच्या सात वाजल्यापासून दिवसभर माहितीच्या पदाधिकाऱ्यांनी परळी शहरातील विविध भागात घरोघर जाऊन नागरिकांच्या भेटी घेत धनंजय मुंडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. या प्रचार फेरीस उत्स्फूर्त असा प्रतिसाद परळीकर नागरिकांनी दिल्याचे पाहायला मिळाले.
धनंजय मुंडे यांनी आम्हाला कोविड काळात मदत केली, धनंजय मुंडे यांनी आम्हाला घरकुल दिले, धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आम्हाला वैद्यकीय मदत मिळाली, आमच्या घरात पाणी घुसले तेव्हा सर्वात आधी धनंजय मुंडे आमच्या मदतीला धावून आले, आमच्या सण उत्सवात, आमच्या सुख-दुःखात धनंजय मुंडे उपस्थित असतात, अशी अनेक कामे नागरिकच यावेळी पदाधिकाऱ्यांना सांगू लागले.
धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात परळी शहर विकासाच्या पथावर असून याची प्रचिती प्रत्यक्ष नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. या प्रचार फेरीत सहभागी झालेल्या गुलाबी साडी परिधान केलेल्या महिला पदाधिकारी यांची संख्याही लक्षणीय होती.
आज या प्रचार फेरीच्या माध्यमातून परळी शहरातील बाजीप्रभू नगर, पंचवटी नगर, स्नेहनगर, जगमित्र हाऊसिंग सोसायटी, स्वाभिमान नगर, औद्योगिक वसाहत, पॉवरलूम, शास्त्रीनगर, शिवाजीनगर, माणिक नगर, जिव्हेश्वर नगर, तसेच सायंकाळच्या सत्रात महर्षी कणाद विद्यालय परिसर, अरुणोदय मार्केट, गुरुकृपा नगर, स्वाती नगर, परमार कॉलनी, जयनगर या भागात डोअर टू डोअर प्रचार करण्यात आला. या प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शुक्रवारी सुद्धा ही प्रचार फेरी शहरातील उर्वरित भागात सुरू राहणार असल्याचे प्रचार समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.