गेवराई पोलीसांच्या कार्याचे सर्वञ कौतुक
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : माझे बाबा घरातुन रागाच्या भरात निघून गेले व फोन करुन मला श्रद्धांजली द्या असे म्हणुन फोन कट केला असल्याची माहिती अल्पवयीन मुलाने गेवराई ठाण्यातील एपीआय संदिप काळे यांना दिली. काळे यांनी यंञणा कामाला लावून त्या व्यक्तीचा शोध लावला व त्या व्यक्तीचा जीव वाचवला. गेवराई पोलीसांच्या या कार्याचे सर्वञ कौतुक होत आहे.
गेवराई तालुक्यातील एका अल्पवयीन युवक शुक्रवारी (ता. ०२) राञी
गेवराई पोलीस स्टेशनला मदतीसाठी आला. यावेळी ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप काळे उपस्थित होते. त्यांनी त्या मुलांचे सर्व मत जाणून घेतले व क्षणाचाही विलंब न करता. यंञणा कामाला लावली. प्रथम त्या मुलांच्या वडीलाच्या मोबाईलचे लोकेशन तपासुन तो व्यक्ती कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती काढली व त्याठिकाणी काळे हे त्याच्या टिम सोबत दाखल झाले. याठिकाणी आल्यावर तो व्यक्ती फाशी घेतल्याच्या स्थितीत दिसुन आला. परंतु लगेच त्या व्यक्तीला गेवराई येथील रुग्णालयात आणले व उपचार सुरु केले. या नंतर येथील डाॅक्टर यांनी ती व्यक्ती बरी असल्याची माहिती काळे यांना दिली यानंतर सर्वच आनंदी झाले. अशा प्रकारे सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे व त्यांच्या टिमने एकाचा जीव वाचवला. गावकर्यांनी आज (ता. ०३) गेवराई पोलीस ठाण्यात येऊन काळे व त्यांच्या टिमचा सत्कार करुन त्यांचे आभार मानले…