Beed : बीड पोलिसांना माहिती मिळाली होती की काही टवाळखोर हे काॅफी शॉप, शाळा, कॉलेज समोर, ट्युशनला जाण्याच्या रस्त्यावर उगाचच टवाळक्या करत उभे राहतात आणि त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या महिला मुले मुली तसेच शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना विद्यार्थिनींना याचा त्रास होत असतो. अशा टवाळखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून बीड जिल्ह्य़ातील सर्व पोलीस स्टेशनला पथके स्थापन करून सदर पथकांच्या मदतीने बीड शहर व जिल्ह्य़ात आज एकुण 67 टवाळखोरांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई केली आहे.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.शितलकुमार बल्लाळ, मारुती खेडकर, अशोक मुदीराज, विनोद घोळवे, सपोनि मधुसुदन घुगे, राजकुमार ससाने, सोमनाथ नरके व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.