मनोरंजनातून सक्षमतेकडे या विचारातून ” होम मिनिस्टर” कार्यक्रमाचे आयोजन – डॉ ज्योती मेटे
महिलांसाठी अनोख्या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल उपस्थित महिलांनी केला स्वयंस्फूर्त डॉ. ज्योती मेटे यांचा सत्कार
बीड प्रतिनिधी : नवरात्र काळात शिवसंग्रामच्या वतीने”जागर मातृ शक्तीचा” हे अभियान राबवण्यात येत आहे. यानिमित्त नवरात्र काळात संबंध महाराष्ट्रत महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा “होम मिनिस्टर” (खेळ रंगला पैठणीचा) हा भव्य कार्यक्रम आशीर्वाद मंगल कार्यालय, बार्शी रोड, बीड येथे पार पडला यात महिलांच्या प्रचंड उपस्थितीत सिने कलाकार क्रांती नाना मळेगावकर आणि सह्याद्री मळेगावकर यांनी उपस्थित महिलांचे मन जिंकली. त्याचबरोबर
मनोरंजनातून महिला सक्षमतेकडे प्रेरित करण्याचे काम या ठिकाणी डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांच्यावतीने करण्यात आले.
यावेळी महिलांसाठी अनोख्या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल उपस्थित महिलांनी केला स्वयंस्फूर्त डॉ. ज्योती मेटे यांचा सत्कार करण्यात आला.
कुटुंबाचा कणा असलेल्या महिलांची दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडत असताना होणारी दमछाक विचारात घेऊन त्यांच्यातील ताणतणावांचा विसरा होणे व अष्टभुजीचे मानसिक बळ त्यांच्यामध्ये निर्माण व्हावे याकरिता मनोरंजनातून सक्षमतेकडे या विचारातून आज न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला आहे असे मत याप्रसंगी शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला कार्यक्रमांमध्ये मनोरंजना सोबतच महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी उद्योजकतिकडे वळविण्यासाठी नवनवीन उद्योगांची माहिती देण्यात आली. तसेच या महिलांना लघु उद्योगांमध्ये मोलाचे सहाय्य करणाऱ्या प्रेरकाना व्यासपीठावर बोलावून डॉ. ज्योती मेटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.