बीड प्रतिनिधी : जिल्हा आरपीआयच्या वतीने बीड येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी रामदास आठवले बीडमध्ये दाखल होताच त्यांनी लोकनेते विनायकराव मेटे यांच्या स्मृती स्थळावर जाऊन त्यांच्या आठवणीला उजाळा देत आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे आरपीआयचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद, अनिल घुमरे सुहास पाटील, सुभाष जाधव आदीसह आरपीआय, शिवसंग्राम चे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विनायकराव मेटे हे मराठा समाजाचे अत्यंत संघर्षशील नेते होते. मराठा आरक्षणासाठी त्यांचा लढा जागृत करणारा होता. मराठा महासंघातून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात करणाऱ्या स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी पुढे शिवसंग्रामच्या माध्यमातून मराठा समाजाचे अविरत कार्य चालू ठेवले परंतु मराठा आरक्षणाच्या बैठकीला मुंबईला जात असताना त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या आशा अकाली निधनाने प्रचंड हानी झाली आहे. त्यांचे आणि माझे अत्यंत जवळचे संबंध होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आरपीआय ने सातत्याने पाठिंबा दिलेला आहे. आज त्यांच्या स्मृतीस्थळावर त्यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता मी या ठिकाणी आलो आहे. मराठा समाजाचा अत्यंत मनमिळावू आणि संघर्षशील नेता आज आपल्यात नाही. याची खंत नेहमी मनात राहील आज या ठिकाणी मी त्यांचं स्मरण करतो आणि त्यांना आदरांजली अर्पण करतो. असे यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिपादन केले.