भारतमातेच्या जयघोषाने शहर दुमदुमले
आष्टी। प्रतिनिधी
वंदे मातरम्,भारत माता की जय,हर घर तिरंगा,घर घर तिरंगा तसेच देशभक्ती पर गीते,हजारो विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 101 फुटी तिरंगा ध्वजारोहण कार्यक्रम मंगळवार दि.13 ऑगस्ट रोजी सकाळी थाटात संपन्न झाला.
प्रत्येकांच्या हाती असलेला तिरंगा ध्वजाणे, आणि भारत मातेच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा घर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत केलेल्या आवाहनाला गतवर्षीप्रमाणे याही वर्षी आष्टीकारांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद याचाच एक भाग म्हणून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ तसेच सुरेश धस मित्रमंडळ यांच्यासह तहसील प्रशासन, नगरपंचायत प्रशासन, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, शहरातील सर्व शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी,आजी माजी त्रिदल संघटना, पोलिस , पत्रकार व विविध क्षेत्रातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये मंगळवार दि.१३ ऑगस्ट रोजी सकाळी १०१ फुट लांबीच्या ध्वज स्तंभावर तिरंगाचे ध्वजारोहण जेष्ठ नागरिकाच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा घर घर तिरंगा अशा घोषणांचा जयघोष करत संपूर्ण शहर दणाणून गेले होते.
आज विद्युत रोषणाई व फटाक्यांची आतषबाजी.
आज बुधवार दिनांक 14 रोजी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी होणार असून सर्व आष्टीकर तसेच परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन राधेश्याम धस यांनी केले आहे.