मुंबई : भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य पंकजाताई मुंडे यांच्या बाबतीत जाणीवपूर्वक फेक नरेटिव्ह सेट व्हावा या दृष्टिकोनातून बातम्या चालवणे, ओढून ताणून कोणत्याही मुद्द्याला ताणून धरत,संबंध नसतांना पंकजाताई मुंडे यांच्या बाबतीतला राजकीय दृष्ट्या निगेटिव्ह नरेटिव्ह सेट व्हावा असे मुद्दामहून करण्याचे प्रकार अनेक वेळा घडलेले आहेत. याबाबत पंकजाताई आता संतप्त झाल्या असून या संबंधित चॅनलवर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे.
महाराष्ट्रात सध्या आयएएस पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असून या प्रकरणात दररोज वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. यातच पूजा खेडकर यांचा भाजपशी संबंध असून त्या पंकजाताई मुंडे यांच्या निकटवर्तीय असल्याच्या अतिरंजीत बातम्या चालवून केवळ सनसनाटी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून व टीआरपीच्या मागे धावताना एखाद्या सार्वजनिक जीवनातील व्यक्तीच्या करिअरला बाधा आणण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे. विशेष म्हणजे पंकजाताई मुंडे यांच्या विधानांमधून अर्धसत्य विधाने काढून तेवढ्याच नकारात्मक संदेश जाणाऱ्या बातम्या चालवणे, अनेक विधानांचे विपर्यास करणे, मनाला येईल ते अन्वयार्थ लावणे आदी विविध प्रकार पंकजाताई मुंडे यांच्या बाबतीत 2014 पासून सुरू आहेत. हे कोणीतरी जाणीवपूर्वक करत असल्याचे दिसून येते. पंकजाताई मुंडे यांना नुकतीच विधान परिषदेवर पक्षाने संधी दिली आहे. त्यांना मंत्रीही केलं जाणणार असल्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. मात्र पंकजाताई मुंडे यांच्या राजकीय वाटचालीतील प्रगती डोळ्याला न देखवणाऱ्या लोकांनी पंकजाताई मुंडे यांच्या बाबतीत खोडसाळपणाने फेक नरेटिव्ह कसा सेट करता येईल यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसते. या संदर्भाने हे पूजा खेडकर प्रकरण संबंध नसताना पंकजाताई मुंडेंशी जोडून अतिरंजीत व सनसनीखेज बातम्या चालविण्याचा सपाटा काही चॅनल्सने सुरू केला आहे. यावर आता पंकजाताई मुंडे या संतप्त झाल्या आहेत. मुद्द्यांचे बोलणं सोडून चुकीच्या गोष्टी पसरविण्याकडे या वाहिन्यांचा इंटरेस्ट असल्याचे म्हटले असून माझ्यासोबत 2014 पासून अशाच पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात असंच चालणार का अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.या संबंधित चॅनल्सवर आपण अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
•