मावळत्या जिल्हाधिकाऱी दिपा मूधोळ- मुंडे यांचे निरोप समारंभ प्रसंगी भावपूर्वक उद्गगार
बीड :- बीड जिल्ह्यामध्ये विकास कामे करतांना अनेक अडचणी आल्या पण बीड जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या प्रेमामुळे त्यावर मात करून बीड जिल्ह्याचा नेहमीच विकासात्मक दृष्टीने विचार केला आणि ही कामे तडीस नेली. शासन आपल्या दारी, महासंस्कृती कार्यक्रम आणि बीड जिल्ह्यात बालविवाह हा ऐरणीवरचा प्रश्न होता. यामध्ये विशेष लक्ष घालून ही मोहीम यशस्वी होण्यासाठी विविध विभागाने मदत केली. त्यामुळे अनेक वेळा बालविवाहही रोखण्यात आले. सर्वांच्या सहकार्याने अनेक विकासात्मक कामे करु शकले, असे भावपूर्वक उद्गगार मावळत्या जिल्हाधिकारी दिपा मूधोळ मुंडे यांनी निरोप समारभ प्रसंगी काढले.
विशेषत: हा नूतन जिल्हाधिकारी अविनाश पाठक (तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी) , मुख्य कार्यकारी अधिकारी संगितादेवी पाटील तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि संबधित यंत्रणेने मोलाचे सहकार्य केले.कृषी क्षेत्रातही बीड जिल्हयाला पहिला क्रमांक मिळाला ही पण आपल्या सर्वासाठी अभिमानाची बाब आहे.
बीड जिल्ह्याविषयी अनेक वेळा नकारात्मक विचारच ऐकायला मिळाले. आपण जेव्हा कोणत्याही कामाचा मनातून ठाम निश्चय करून ते करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ते सकारात्मकतेतून पूर्णत्वास जाते, बीड जिल्ह्याच्या आठवणी हया अमिट आहेत, त्या मी कधीही विसरू शकणार नाही. घर सांभाळणे, कुटुंब सांभाळणे ही जबाबदारी केवळ महिलांचीच नसून पुरुषांची देखील आहे. जे गरीब, पिडीत लोक आहेत त्यांची कामे, करा त्यांचा अर्शिवाद नक्कीच तुमच्या कामी येईल. बीड जिल्हयात मोठे उद्योग, कारखाने नाहीत त्यामुळे तरुण वर्गाच्या हाताला काम नाही येथे मोठे उद्योग येतील यासाठी प्रयत्न करावा,तरुण पिढीला याचा उपयोग होईल. शेवटी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे निरोप समारंभाला उत्तर देताना म्हणाल्या की, मुलांना जपा त्यांच्या शिक्षणाकडे, आरोग्याकडे लक्ष द्या, बीड जिल्ह्यामध्ये तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे ही फार गंभीर बाब आहे, असे भावनिक उद्गारही मावळत्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
नूतन जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे म्हणाले की. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहील. मावळत्या जिल्हाधिकारी यांच्यामध्ये मला नेहमी आईच दिसत असे, त्यांनी नवरात्रीची तीनच रूपे दाखवली, अष्टमी व नवमीचे रूप त्यांनी कधी दाखवलेच नाही, त्यांच्या कामाची हातोटी आणि संयम हा नेहमीच लक्षात राहण्यासारखा आहे. बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक हा सर्व देशात लक्ष वेधून घेणारा विषय होता पण तोही त्यांनी संयमाने, चातुर्याने हाताळला, जिल्हयात जाळपोळ झाली त्यावेळी त्यांनी फक्त यंत्रणाचा कामाला लावली नाही तर त्या स्वत: रस्त्यावर उतरल्या व जमाव शांत केला. कोणतेही काम असो जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे हया स्वत: पुढाकार घेउन करत असत , ही मोठी महत्त्वाची बाब आहे. श्रीमती मुधोळ-मुंडे यांचा संयमाने काम करण्याचा आदर्श घेण्यासारख असून त्यांच्या सोबत छत्रपती संभाजीनगरपासून ते बीड जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळल्यापासूनचा अनुभव माझ्या पुढील वाटचालीस निश्चितच कामी येईल, असे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यावेळी म्हणाले.
. या कार्यक्रमास नूतन जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) शैलेश सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक अशोक बडे, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुंबे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके व विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी यांनी श्रीमती मुंडे यांचा सत्कार केला तसेच आपल्या मनोगतातुन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांच्या सोबत काम करतानाचे अनुभव सांगितले.