बीड/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून बीड जिल्ह्यातील नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती दिनकर कदम,विलास बडगे,सुधाकर मिसाळ, मुखींद लाला,सनी वाघमारे, राणा चव्हाण यांनी दिली आहे
बीड लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेबाबत कार्यकर्ते मतदार यांच्या त मोठा संभ्रम निर्माण झाला होता कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीत कोणती भूमिका असावी यावर माजी मंत्री क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता सर्व स्तरातील सर्व समाजातील कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका अखेर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली आहे त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि मतदारांनी लोकसभा निवडणूक प्रक्रियेत शंभर टक्के मतदान करून आपल्या स्तरावर सद् विवेक बुद्धीने विचार करून मतदान करावे.माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मानणाऱ्या सर्वच कार्यकर्ते आणि मतदारांनी त्यांच्या मर्जीतील/मताप्रमाणे उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन दिनकर कदम, विलास बडगे, सुधाकर मिसाळ, मुखींद लाला,राणा चव्हाण,सनी वाघमारे यांनी केले आहे