<बीड : पीक लागवडीसाठीची शेतजमीन आणि प्लॉटिंग याचा फरक कळत नसलेल्या कृषिमंत्र्याचा अभ्यास कमी पडतोय. असा खरपूस समाचार घेत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आणि इंडिया विकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी कृषी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे नाव न घेता जळजळीत टिका केली. बीड लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा अर्ज भरल्या नंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना पालकमंत्र्यांनी शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, बजरंग बप्पा सोनवणे यांची शेतकरी नसून प्लॉटिंगचा व्यवसाय करतात. याचे सडेतोड उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आणि इंडिया विकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी म्हटले की, या राज्याच्या कृषी मंत्र्यांना आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांना ज्या जमिनीत मी ऊस आणि अन्नधान्य पिकवतो. त्या शेतजमीन आणि प्लॉटिंगची जमीन यांच्यातला फरकच कळत नसेल तर ते आमचे दुर्दैव असुन मंत्री महोदयांच्या अभ्यास कमी पडतोय. अशी बोचरी टीका केली. तसेच जर माझा व्यावसाय प्लॉटिंगचा असेल आणि माझी जमीन ही शेत जमीन नसेल तर भाजपच्या उमेदवार निवडणुकीत माघार घेतील काय ? असे खुले आव्हान बजरंग सोनवणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि पालक मंत्री ना. धनंजय मुंडे यांचे नाव न घेता प्रसार माध्यमांशी बोलताना केले. दरम्यान बीड लोकसभेची निवडणूक ही आता विकास कामाच्या ऐवजी वैक्तिक पातळीवर आलेली असून मागील पंधरा वर्षां पासून एकाच कुटुंबात सत्ता असताना देखील जिल्ह्याचा विकास झालेला नाही तसेच लोकसभा सदस्यांनी त्यांनी विकास निधी सलग दहा वर्षांत त्याचा विनियोग न केल्यामुळे त्यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा विकास निधी केल्याने परत गेला. यांच्या सारखे जिल्ह्याचे दुर्दैव नाही. जे विकास निधी विकास कामासाठी खर्च करू शकत नाहीत ते काय मतदार संघाचा विकास.करतील? अशी चर्चा आता जिल्ह्यात सुरू आहे.