बीड प्रतिनिधी :- संपूर्ण जिल्ह्यात सध्या पाण्याचे प्रमाण कमी झाले असून टंचाई जाणवत आहे. बीड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी टॅंकर सुरू करा. अशी मागणी आ.संदिप क्षीरसागर यांनी शासन व जिल्हाप्रशासनाकडे केली आहे.
दि.१० नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन परिपत्रकात बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला असून त्याबाबत उपाययोजना नमूद केल्या आहेत. त्यानुसार, सद्यस्थितीला संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने बीड विधानसभा मतदारसंघातील बीड व शिरूर-कासार तालुक्यासह जिल्हाभरात टॅंकरने पाणीपुरवठा करून पाण्यावाचून होणारी नागरिकांची अडचण सोडवण्यासाठी तात्काळ टॅंकर सुरू करावेत अशी मागणी आ.क्षीरसागरांनी केली आहे. याबाबत आ.संदिप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.