लाच प्रकरण आले अंगलट; कर्मचार्यांने रिक्षा चालकाकडून घेतला होता हप्ता
प्रारंभ न्युज
बीड : बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यापासून अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू होता. त्यातच बुधवारी रिक्षा चालकाकडून सहाशे रुपये हप्ता घेताना येथील एका कर्मचाऱ्यास एसीबीने ताब्यात घेतले होते. यानंतर येथील सर्व कारभार चव्हाट्यावर आला होता. याचेच वृत्त प्रारंभने बुधवारी व गुरुवारी प्रकाशित केले होते. याची दखल घेऊन आज पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांची तडकाफडकी कंट्रोल रूमला बदली केली. त्यांच्या जागी तात्पुरता चार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक रणखांब यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे आता ग्रामीण ठाणे हद्दीतील कारभार चांगला चालेल, याठिकाणी सक्षम अधिकारी द्यावा अशी मागणी सुद्धा आता होत आहे.