बीड प्रतिनिधी :- बीड मतदार संघातील एकूण १७ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाने चांगलीच बाजी मारली आहे. बीड तालुक्यातील ४, शिरूर(का.) तालुक्यातील ७ आणि केज तालुक्यातील २ अशा १३ ग्रामपंचायतीवर माजी मंत्री क्षीरसागर गटाने वर्चस्व मिळवले आहे. आजही ग्रामीण भागातील जनतेने माजी मंत्री क्षीरसागर यांनाच कौल दिला आहे. काहीही असले तरी आम्ही आण्णासाहेबांच्या बरोबरच आहोत हेच यावरून लक्षात घेण्यासारखे आहे.
बीड मतदार संघातील १७ ग्रामपंचायतची निवडणूक रविवारी झाली आणि सोमवारी निकाल जाहीर झाला. यात १७ पैकी ११ ग्रामपंचायत मध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाने दणदणीत विजय मिळवला असून बीड तालुक्यातील ४, शिरूर(का.) तालुक्यातील ७ आणि केज तालुक्यातील २ ग्रामपंचायतच्या निकालात मोरगाव- सौ.लताबाई लिंबाजीराव जाधव, घोडका राजुरी – सौ.बारकूबाई चंद्रसेन घोडके, लक्ष्मीआई तांडा – सौ.अनिता राजेंद्र राठोड, वासनवाडी – सौ.सुदामती सतीश शिंदे, पाडळी – गहिनीनाथ पाखरे, हिवरसिंगा – सौ.ज्योती विजय शिंदे, तागडगाव – सौ.सुरेखा नवनाथ सानप, मलकाचीवाडी/ढोरकडवाडी – सौ.कुसुमबाई शहादेव चव्हाण, खांबालिंबा – बालाजी गिते, आर्वी – सौ.मीरा यादव, जांब/ढोकवड – सौ.राधा नागरगोजे यांचा आणि नाळवंडी ३ सदस्य, ढेकणमोहा तांडा ३ सदस्यांचा दणदणीत विजय झाला असून केज तालुक्यातील नांदूरघाट आणि काळेगाव घाट या ग्रामपंचायती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील जनता आजही अण्णांच्या बरोबरच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सर्व विजयी उमेदवारांचे स्वागत प्रा.जगदीश काळे, विलास बडगे, मुखीद लाला, ॲड.शेख खाजा, सुभाष क्षीरसागर, अरुण बोंगाणे, अंकुश राठोड, चंद्रकांत पेंढारे, चिमाजी वाघमारे, डॉ.अरुण भस्मे, डॉ.राजा मचाले, गणेश राऊत, अशोक शिंदे यांनी केले.