बीड :सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभर मराठा एकजुटीचा एल्गार पुकारणारे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांच्या
सफेपुर फाटा येथील सभेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांच्या पुढाकाराने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि धर्मवीर प्रतिष्ठानतर्फे मांजरसुंभा येथे नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, मोफत अन्नदान, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी याचा लाभ घेतला.
सामाजिक आणि आरोग्य सेवेत अग्रेसर असलेले बाजीराव चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या बीड तालुक्यातील बीड-केज रोडवरील सफेपुर फाटा येथील सभेसाठी येणाऱ्या समाज बांधवांसाठी आरोग्य शिबिरासहअन्नदान,
पिण्याच्या पाण्याची करण्यात आली होती. हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला. आरोग्य शिबीर, अन्नदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी धर्मवीर प्रतिष्ठानचे डॉ. जाधव, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बीड जिल्हा प्रमुख महादेव मातकर, संदीप माने,अरुण घुमरे कृष्णा यादव,विलास मस्के,आदींनी परिश्रम घेतले.
आपण समाजाचे देणेकरी
लागतो : बाजीराव चव्हाण
आरोग्यसेवक या नावाने राज्यात प्रसिद्ध झालेले तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, ओएसडी मंगेश चिवटे,बाजीराव चव्हाण हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून सफेपुर फाटा येथील मराठा आरक्षण सभेच्या अनुषंगाने आरोग्य शिबीर, मोफत अन्नदान, पिण्याच्या पाण्याची केलेली सोय ही सामाजिक बांधिलकीतून केली. आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो, याच भावनेतून खारीचा वाटा उचलला अशी प्रतिक्रिया बाजीराव चव्हाण यांनी दिली.