_1098 क्रमांक जनमानसात रुजत आहे_
बीड : ऊसतोड कामगारांचे स्थलांतर बालविवाह निर्मूलन मोहिमेला गती मिळावी असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आज झालेल्या बालविवाह निर्मूलन आढावा बैठकीत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात आज बालविवाह निर्मूलन मोहिमेचा आढावा बैठक घेण्यात आली . या बैठकीचे अध्यक्षता जिल्हाधिकारी यांनी केली यावेळी महिला व बाल विकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान, समाज कल्याण आयुक्त रमेश शिंदे, बाल समिती न्यायालय चे अध्यक्ष अशोक तांगडे बैठकीस उपस्थित होते.
यावेळी आतापर्यंत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली यासह जिल्हा कृती दलामार्फत महिन्याभरात 25 बालविवाह थांबविण्यात आले. यामध्ये सर्वाधिक फोन कॉल 1098 फोन करून माहिती देण्यात आल्याचे लक्षात आले. 1098 हा क्रमांक अधिक ग्रामीण भागापर्यंत पोहोचावा असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी.
*दर मंगळवारी महान स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाचे वाचन*
यापुढे दर मंगळवारी मंगळवारी महान व्यक्तिमत्व असणाऱ्या ऐतिहासिक स्त्रियांच्या चरित्रांचे वाचन करण्यात येईल. आतापर्यंत दर सोमवारी बाल विवाह निर्मूलना संदर्भात शाळांमधून प्रतिज्ञा घेण्यात येत आहे. माता पालकांच्या बैठकी, विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, शाळांमध्ये नाटिका करावी, ज्या – ज्या माध्यामांतून बाल विवाह रोखला जाऊ शकतो त्या सर्व गोष्टींचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले .
ग्राम बाल संरक्षण समिती व तालुका बाल संरक्षण समिती गठीत करुन त्यांच्या नियमित बैठका घेण्यात यावेत.
“बाल विवाह मुक्त बीड जिल्हा” कृती आराखडयात नमूद केल्यानुसार सर्व विभागांने कार्यवाही करुन त्यांचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्यात यावा, असे निर्देशित करण्यात आले. एप्रिल 2023 पासून 197 बाल विवाहाच्या केसेस चाईल्ड हेल्प लाईन बीड यांचेवतीने थांबविण्यात आल्या आहेत. सदर कालावधीत बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये 17 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासह. पोलीस खात्याचे महीलासांठी नेमलेल्या दामिणी पथकांने शाळा व कॉलेज मध्ये नियमित भेट दयाव्यात. बाल विवाह निर्मूलन अनुषगांने “एका गावात एक कार्यक्रम” पंचायत विभागाने आयोजित करावा.
दि.14 नोव्हेंबर 2023 बाल दिनाचे औचित्त्य साधून 11 ते 18 वयोगटातील मुलींनी “माझा बाल विवाह करु नये” या आशयाचे पत्र पालकांस लिहणे. हा उपक्रम प्रत्येक माध्यामिक व उच्च माध्यामिक शाळेत राबविण्यात यावा. सलग 15 दिवस माध्यामिक व उच्च माध्यामिक शाळेत मुलगी गैरहजर असेल तर मुख्याध्यापक यांनी स्वत : गृहचौकशी करावी बाल विवाह होणार नाही या बाबत जनजागृती करावी. आदि उपक्रम होत आहेत.