आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रस्ताव तयार
बीड ः येथील जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने आरोपींच्या स्थावर मालमत्ता एमपीआयडी कायद्यानुसार जप्त करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच या प्रकरणात कारवाई होणार असल्याची माहिती आहे.
अधिकच्या व्याजाचे अमिष दाखवून जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट बँकेने हजारो ठेवीदारांची 100 कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी बीड, नेकनूर, ईट येथे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहेत. आता या गुन्ह्यातील आरोपी अनिता शिंदे, बबन शिंदे, मनीष शिंदे, व्यवस्थापक अश्विनी वांढरे यांच्यासह आदींच्या मालमत्तेची माहिती जमा करण्यात आली आहे. 51 स्थावर मालमत्ता जप्तीसाठी व एमपीआयडी कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने प्रस्ताव तयार केला आहे. अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी दिली आहे.
जमीनीसह वाहनांचाही समावेश
एक बीएमडब्ल्यू कारसह काही स्कूलबस ब्लॅकलीस्ट केल्या असून त्याची आरटीओकडून किंमत ठरवली जाणार आहे. तसेच बीड तालुक्यात जमीन, फ्लॉट अशी एकूण 51 स्थावर मालमत्ता आहे. दरम्यान या गुन्ह्याचा मास्टरमाईंड बबन शिंदे अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.