बीड: कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची बीडच्या पालकमंत्रीपदी घोषणा होताच बीड विधानसभा मतदारसंघाचे नेते बळीराम गवते यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन आनंदोत्सव साजरा केला. जवळपास अर्धातास फटाक्यांची अतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरविले.
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी देऊ, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील दोन महिन्यांपुर्वी बीड येथे झालेल्या उत्तरदायित्त सभेत केली होती. दरम्यान, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडची संपुर्ण यंत्रणेवर कमांडही केली होती, मात्र पालकमंत्री पदाची घोषणेची औपचारितका बाकी होती. बुधवार दि.४ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बारा जिल्ह्याचे पालकमंत्री जाहिर केले असून यात बीडच्या पालकमंत्रीपदी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची वर्णी लागली आहे. पालकमंत्री म्हणून घोषणा होताच राष्ट्रवादी (अजित पवार गट)तील बीड विधानसभा मतदारसंघाचे नेते बळीराम गवते यांनी सहकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत फटाक्यांची अतिषबाजी करून जल्लोष केला.यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस अविनाश नाईकवाडे, तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर, युवक तालुका अध्यक्ष नंदकुमार कुटे, माउली गायकवाड, गट प्रमुख योगेश बाहिरवाळ, संदीप उबाळे, शिराज तांबोळी, आप्पा इंदुरे, भागवत मस्के, सचिन घरत, आकाश झुनगुरे, राहुल गवळी, विशाल कोटुळे, उत्रेश्वर पाचंग्रे, फय्याज पठाण, मुस्ताक शेख, गजानन फाटे, सनी सातपुते, गणेश ढगे, नविद भाई, राजाभाऊ लोंढे, शेख अन्वर, सिकंदर पटेल, महेश मस्के, विजय ओव्हाळ, रतन वाघमारे, कौसर शेख, गणेश आहेर, हनुमान सोनवणे, ज्ञानेश्वर गवते, व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.