पाटोदा पंचायत समितीत एसीबीची कारवाई
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : कृषिसेवा केंद्र दुकानातील औषधांचे सॅम्पल न घेण्यासाठी व वर्षभराच्या सिझनमध्ये कारवाई न करण्यासाठी पाटोदा पंचायत समितीतीतल विस्तार अधिकारी यांनी दहा हजारांची लाच घेताना आज एसीबीने रंगेहात पकडले, या कारवाईने पाटोदा तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही कारवाई धाराशीव एसीबीच्या टिमने केली.
जयश मुकूंद भुतपल्ले वय 36 वर्षे विस्तार अधिकारी कृषि, वर्ग-3, पंचायत समिती पाटोदा यांनी संबंधित तक्रारदाराकडून तुमच्या कृषि सेवा केंद्र दुकानातील औषधाचे सॅम्पल न घेण्यासाठी व वर्षभराच्या सिझनमध्ये कारवाई न करण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी संबंधित तक्रारदाराला दहा हजाराची मागणी केली होती. यामध्ये दहा हजाराची रक्कम घेताना आज संबंधित विस्तार अधिकाऱ्याला एसीबीने रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, पोलीस उपअधीक्षक धाराशीव सिद्धराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पो.नि.नानासाहेब कदम, धाराशीव, सापळा पथक पोलीस अंमलदार विशाल डोके, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य, दत्तात्रय करडे यांनी केली.