खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक समरसता निर्माण होते – राजेंद्र मस्के
खा. प्रितम ताईंच्या हस्ते राजेंद्र मस्के चषक क्रिकेट स्पर्धांचा शुभारंभ संपन्न …!
( बीड प्रतिनिधी )
सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असून, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. नैराश्याच्या परिस्थितीत ताण तणाव कमी करून, मनाला उर्जा मिळण्यासाठी खेळाची गरज आहे. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे राजेंद्र मस्के चषक क्रिकेट स्पर्धांचे तालेब काका मित्र मंडळाच्या वतीने आयोजन कौतुकास्पद आहे. खेळाला धर्म जात नसतो. खेळाच्या माध्यमातून विविध धर्म जातीतील खेळाडू, एकत्रित येऊन खेळ खेळतात. यामुळे एकमेकाविषयी प्रेम, सहानभूती निर्माण होते. बीड जिल्ह्यात सर्व जाती धर्माचे लोक प्रेमाने व एकोप्याने राहतात. सर्व धर्म समभाव आपली खासियत असून, जिल्ह्याच नाव उंचीवर नेणारी आहे. असे विचार प्रकट करत या प्रेमाला आणि एकोप्याला कोणाचीही नजर लागू नये. अशी अल्ला आणि ईश्वराकडे पार्थना करत सर्व खेळाडूंना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
शहरातील तालेब काका मित्र मंडळाने पुढाकार घेऊन क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून खेळांडूना संधी उपलब्ध करून दिली. खेळ व विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक समरसता निर्माण होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवनिमित्त प्रख्यात गायक आनंद शिंदे यांचा गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यापुढेही अशा विधायक कामाला भारतीय जनता पार्टी प्रोत्साहन व मदत करेल असा विश्वास यावेळी राजेंद्र मस्के यांनी दिला.
तालेफ काका मित्र मंडळ आयोजित राजेंद्र मस्के चषक 2023 भव्य क्रिकेट स्पर्धा शुभारंभ आज छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बीड येथे खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, मा. ॲड.सर्जेराव तांदळे, शेख तालेब, संतोष हंगे, मा. शेख इरशाद भाई , प्रा. देविदास नागरगोजे, सलीम जहागीर, नवनाथ शिराळे, चंद्रकांत नवले, प्रा. गोपाल धांडे, जगदीश भैय्या गुरखूदे, कामरान खान, तालेब काका मित्र मंडळाचे दद्दू खान, शेख एते शाम, सय्यद इम्रान, कामरान खान, अहेबार मलिक, हुजेर खान, महम्मद फुरखान, गुड्डू चाऊस, अत्थर भाई, शेख मुसा खान , मुसा खान पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी सुनील मिसाळ, बालाजी पवार, मीराताई गांधले, संध्याताई राजपूत, प्रीतीताई कुकडेजा, शिवाजी मुंडे, शांतीनाथ डोरले, अजय सवाई, डॉ. लक्ष्मण जाधव, अनिल चांदणे, कपिल सौदा, शरद झोडगे, हरीश खाडे,राजू शहाणे, बद्रीनाथ जटाळ, कृष्णा तिडके,रवी गंगावणे, पंकज धांडे, शफिक काजी, मोहसीन पठाण, शफिक पेंटर, नानासाहेब शिंदे, गणेश लांडे, शरद बडगे विलास बामणे, रवी कळसाने, गणेश तोडेकर, समर्थ तांदळे, आबा येळवे, वसंत गुंदेकर, सतीश कळसुले चव्हाण टेलर, भीमराव तुपे, प्रभाकर कानडे, ज्ञानेश्वर आंधळे, अप्पा झोडगे, सुग्रीव डोके, बाबुराव कदम, नरेश पवार, भारत खोड, अतुल कवचट यांच्यासह पदाधिकारी क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.