बीड प्रतिनिधी :- १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथे होणार्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी सुचविलेल्या विकास कामांचे व विविध मागण्यांचे परिपूर्ण प्रस्ताव आपापल्या मंत्रालयीन विभागांकडे सादर करा असे आदेश जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागाच्या जिल्हा कार्यालयांंना दिले आहेत.
मराठवाड्याच्या विकासासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक छत्रपती संभाजी नगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवार (१६ सप्टेंबर) रोजी होणार आहे. या बैठकीत बीड मतदारसंघातील विविध विकास कामे व प्रश्न यांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला होता. यावर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ आदेश काढून आ.क्षीरसागर यांनी विकास कामे व विविध मागण्यांचे विकासात्मक परिपूर्ण प्रस्ताव आपापल्या मंत्रालयीन विभागांकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
*आ.संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या मागण्या*
१) बिंदुसरा नदीवरील बीड शहरात विशेष बाब म्हणून निम्न पातळी बंधारा करण्यात यावा.
२) टुकुर (खांडेपारगाव ता. बीड) साठवण तलाव योजनेच्या ऐवजी फेर नियोजनातून नऊ को.प. बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यतेसह मंजुरी देण्यात यावी.
३) कचारवाडी ता. बीड तलाव प्रशासकीय मान्यता पुर्नजिवित करणे बाबत. शिवणी ता. बीड तलावातुन ओव्हरफ्लो होणारे पाणी जरूड ता. बीड येथे पाईपलाईनने सोडण्या बाबतच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात यावी.
४) बीड शहरातुन जाणाऱ्या जालना रोड नॅशनल हायवेवरील पोल व इतर विद्युत साहित्य शिफ्टींग व सुशोभीकरण करणे.
५) बीड शहर, बीड व शिरूर का. तालुक्यातील जुने पोल बदलणे व केबलद्वारे कामे करणे. पाली ता.बीड ३३/११ के.व्ही. मंजुर असलेले उपकेंद्राचे पुढील कार्यवाही होवून काम चालू होणे बाबत.
६) आर.डी.एस.एस. (R.D.S.S.) योजनेच्या माध्यमातून बीड विधानसभा मतदार संघातील
बीड व शिरूर का. तालुक्यात ३३/११ के.व्ही. उपकेंद्र, आरमाड केबल बसवणे, ६३,१००, २०० के.व्ही. चे रोहित्र उपलब्ध करणे, पोल व तारा बदलणे याकामासाठी निधी देण्यात यावा.
७) दुष्काळ परिस्थिती असल्याने पाणी पुरवठा योजनेचे व शेतकरी बांधवांचे वीज कनेक्शन न तोडणे, ५. ६. एनएससी (N.S.C.) या योजनेच्या माध्यमातून बीड मतदार संघात निधी उपलब्ध व्हाव.
८)कुसुम सौर पंप योजना २०२३ अंतर्गत शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त लाभ देण्यात यावा.
९) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात ३९१ गावे निवडण्यात आलेली आहेत. बीड विधानसभा मतदार संघ व बीड जिल्हा हा आवर्षन व शेतकरी बांधव आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्याने दुसऱ्या टप्प्यात मतदार संघातील व जिल्ह्यातील सर्व गावांची निवड व्हावी.
१०) बोरफडी, दगडी शहाजानपुर ता. बीड येथील उपकेंद्र बांधकामास निधी देणे बाबत.
११) शासनस्तरावरून ३० खाटाचे आयुष रुग्णालय एनआरएचएम अंतर्गत मजुर आहे. त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी.
१२) प्राथमिक आरोग्य केंद्र चौसाळा ता. बीडचे रूपांतर उपजिल्हा रूग्णालयात केलेले आहे. त्यावर पुढील कार्यवाही होऊन काम सुरू होणे बाबत.
१३) श्री क्षेत्र नारायणगड येथील विकास कामांसाठी मंजूर असलेले २२.५० कोटी रूपयांचा निधी वितरित करून उर्वरीत कामे करण्यासाठी मंजूरी देण्यात यावी.
१४) बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील बीड व शिरूर तालुक्यात असणार्या तिर्थक्षेत्रांना पर्यटन विकास आराखड्यात सामाविष्ट करून विकासकांना मंजूरी देण्यात यावी.
१५) बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वर महालक्ष्मी चौक (रामनगर) व छत्रपती संभाजी महाराज चौक (कोल्हारवाडी) येथे उड्डाणपूल करण्यात यावा.
१६) बीड शहराच्या बाहेरून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.५२ बाह्यवळण रस्ता महालक्ष्मी चौक ते संभाजी महाराज चौक पर्यंत स्लीप सर्व्हीस रोड करण्यात यावा.
१७) बीड विधानसभा मतदारसंघातील जरूड, बोरखेड, ढेकणमोह नाळवंडी ता.बीड व खालापुरी ता. शिरूर का. येथे पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकामास मंजुरी व निधी देण्याबाबत.
१८) मौजे करचुंडी येथे नवीन पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर होणेबाबत.
१९) बीड मतदारसंघातील उघड्यावर भरत असलेल्या अंगणवाडीस इमारत देणेबाबत.
२०) बीड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढविणे व सुशोभिकरण करणे. या कामासाठी झालेल्या अंदाजपत्रकास निधीसह मंजूरी देणेबाबत.
२१) बीड शहरात अमृत योजनेची कामे अंतिम टप्प्यात आहेत.बीड नगर परिषदेला जोपर्यंत महावितरणकडून अधिकचा विद्युत भार मंजूर होत नाही. तोपर्यंत आपल्याला पूर्ण क्षमतेने बीड शहरात पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. सध्याचे मंजूर अधिभारानुसार फक्त 10 एमएलडी पाणी वाढत आहे. सध्या बीड शहराला 49 एमएलडी ऐवजी फक्त 30 ते 32 एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. ही योजना तात्काळ पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी.
२२) बीड शहराच्या हद्दवाढ भागामध्ये सर्व प्रकारचे विकास कामे होणे बाबत मंजुरी देणे बाबत.
२३) लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती,दलितेत्तर,नगरोत्थानची कामे सर्व भागामध्ये व घटकापर्यंत मंजुरीसह देणे बाबत.
२४) बीड बसस्थानकामध्ये प्रवाशांची व आपल्या कर्मचार्यांची योग्य ती देखभाल होणेसाठी त्या ठिकाणी प्रवाशांची बसण्याची व्यवस्था आपल्या महामंडळाच्या गाडी वाहनतळाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,कर्मचार्यांना विश्रामगृह व इतर सुविधा देणे बाबत आजमित्तीला प्रस्ताव तयार करून सदरील कामे मंजुर करून पुढील सत्वर कार्यवाही होणे बाबत.
२५) बीडमधील एमआयडीसी भागामध्ये पोलीस स्टेशन अथवा पोलीस चौकी देणे बाबत.
२६) बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या इमारत बांधकामास मंजुरीसह निधी देणे बाबत.
२७) एमआयडीसी भागामध्ये रस्ते,पाणी व इतर विकास कामे होणे बाबत.
२८) युवा शांतीवन ता.बीड येथील उर्वरित विकास कामे करणे.
२९) देवराई ता.बीड येथील आराखड्यास मान्यता देवून उर्वरित मान्यता देणे.
३०) बीड विधानसभा मतदार संघातील मौजे भानकवाडी ता.शिरूर का. येथे दि.20.10.2022 रोजी परिसरामध्ये अतिवृष्टी व मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे नदी व नाल्यांना पुर आल्याने भानकवाडी ते साळुंकेवस्ती या रस्त्यावरील नळकांडी पुल नसल्याने तेथे तीन बालकांचा पुराच्या पाण्यामध्ये मृत्यु झालेला आहे. सदरील बाब लक्षात घेता व भविष्यात पुन्हा अशा प्रकारच्या जिवितहानी न होणेसाठी सदरील नळकांडी पुल बांधकामासाठी मंजुरी देवून निधी देण्यात यावा.
३१) जिल्हा क्रीडा संकुल येथील विविध विकास होणे बाबत.
३२) तालुका क्रीडा संकुल बीड येथे विविध विकास कामे होणे बाबत.
३३) बीड मतदार संघासह बीड जिल्हा आवर्षनग्रस्त होत आहे तसेच शेतकरी आत्महत्या, पशुधन चारा व पाण्याचा प्रश्न व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या संदर्भात तात्काळ उपाय योजना करणे व बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करणे.