कृषीमंत्री आणि पालकमंत्र्यांनी शिरूर का तालुक्याबाबत दूजाभाव करू नये – राजेसाहेब देशमुख
शिरुर (का) प्रतिनिधी – काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले खा.रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव दादा पाटील,युवक नेते आदित्य दादा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ थोटे, जिल्हा उपाध्यक्ष जुबेर चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर (का) तालुक्यातील सर्व मंडळातील शेतकऱ्यांना अग्रिम विमा देण्यात यावा, तसेच 100/ विमा लागू करून हेक्टरी पन्नास हजार अनुदान देण्यात यावे, दुष्काळी परिस्थिती मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, पिण्याच्या पाण्या सहीत जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, संजय गांधी, श्रावणबाळ योजनेची मानधन रक्कम वाढविण्यात यावी तसेच चालू वर्षातील शेतकऱ्यांचे पिककर्ज माफ करून शिरूर (का) तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आदी मागण्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, जिल्हा सरचिटणीस भास्करराव केदार, तालुकाध्यक्ष रमेश सानप यांच्या नेतृत्वाखाली आज शिरूर (का) तहसिल कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा धडकला यावेळी
तहसिलदार शिवनाथ खेडकर साहेबांनी निवेदन स्विकारले
यावेळी आष्टी तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रविंद्र ढोबळे, सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ दिलीप मोटे, ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.संभाजी जाधव, शिरूर शहराध्यक्ष आसिफ शेख, सहकार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ठकसेन तुपे, ज्येष्ठ नेते राम शेळके, अशोक बहिरवाल, बारीकराव खेंगरे, दादासाहेब तासतोडे, हरिभाऊ सावंत, विज्ञान तंत्रज्ञान काँग्रेसचे मराठवाडा विभागीय संघटक कानिफनाथ विघ्ने, महादेव सावंत, विष्णू मस्के, अशोक केकान, अशोक केदार,परवेझ कुरेशी, गणेश जवकर, संतोष निकाळजे, सौ.सिमाताई जायभाये, ज्ञानेश्वर ढवळे, संजय खताने, ऋषिकेश केदार,ओम केदार, कृष्णकांत केदार, विलासराव बेळगे, प्रकाश ढाकणे, रविंद्र थिटे, ज्ञानेश्वर थिटे आदी काँग्रेस पदाधिकारी आणि तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला