बीड प्रतिनिधी: जिल्ह्यातील सोयाबीन या पिकाच्या अग्रीम पीक विम्या योजनेतून जिल्ह्यातील १३ महसूल मंडळाना वगळण्यात आले होते. मात्र कृषीमंत्री धनंजय मुंडे हे बीडचे आणि शेतकऱ्यांचे कैवारी असल्याने त्यांनी हा विषय सोडविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत सर्वच्या सर्व महसूल मंडळांमध्ये सोयाबीन पिकास अग्रीम २५ टक्के पीक विमा लागू केला आहे. त्यांच्यामुळेच आज शेतकऱ्यांचा फायदा होत आहे, असे पत्रक बीड विधानसभा मतदारसंघाचे नेते बबनराव गवते यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने सदोष किंवा नियमात न बसणारे खंड दाखवण्यात आले होते, त्या मंडळांचाही समावेश आता करण्यात आला आहे. पूर्वी मंजूर ७३ व नव्याने करण्यात येत असलेले १३ अशा सर्वच मंडळांमध्ये आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अग्रीम २५ टक्के पिकविम्याचा आधार मिळणार आहे.कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, विद्या वेत्ता तसेच वेगवेगळ्या उपग्रहांच्या पावसाची नोंदणी केलेल्या अहवालांच्या आधारे केवळ खंड यावर अवलंबून न राहता विविध निकषांचा सुयोग्य वापर करून हा अग्रीम पीकविमा मंजूर करून घेण्यासाठी धनंजय मुंडे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.बीड मतदारसंघातील मंडळांना सोयाबीन अग्रीम पिक विम्यातून वगळण्यात आले होते. यानंतर राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. यानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे या विषयासंदर्भात चर्चाही करण्यात आली होती. चर्चेदरम्यान, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सोयाबीन अग्रीममध्ये सर्वच्या सर्व मंडळ घेतले जातील, असे म्हटले होते. यानंतर अवघ्या काही दिवसात जिल्ह्यातील १३ मंडळांचा अग्रीमसाठी समावेश केला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत, असेही राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे नेते बबनराव गवत यांनी म्हटले आहे.