व्यापारी महासंघाच्या मागणीला यश
(बीड-प्रतिनिधी) मा. जिल्हाधिकारी,बीड यांनी जिल्ह्यात दि. 26 मार्च 2021 पासून 10 दिवसाचे लॉकडाऊनची घोषणा केलेली होती परंतु व्यापार्यांचे होणारे नुकसान नागरिकांची होणारी गैरसोय ही बाब जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर या गोष्टीवर सकारत्मक विचार केला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते.
मा. जिल्हाधिकारी बीड यांनी लॉकडाऊनच्या आदेशामध्ये बदल करुन जिल्ह्यातील व्यापारी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नवीन आदेश निर्गमित केले आहे. या नवीन आदेशामुळे व्यापारी वर्गाने जिल्हाधिकारी महोदयांचे आभार मानले आहेत.
बीड शहर व जिल्हा व्यापारी महासंघातर्फे व्यापारी बांधवांना विनम्र आवाहन करण्यात येते की, जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोविड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेेले नियमाचे तंतोतंत पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे जेणेकरुन आपण व्यवसाय करुन कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखु शकतोत.
यावेळी मा. रविंद्र जगताप, जिल्हाधिकारी,बीड यांचे आभार मानण्यासाठी सर्वश्री संतोष सोहनी, कार्याध्यक्ष, बीड जिल्हा व्यापारी महासंघ, विनोद पिंगळे, शहराध्यक्ष, व्यापारी महासंघ, अशोक शेटे, जवाहरलाल कांकरीया, भास्कर गायकवाड, प्रकाश कानगांवकर, विनोद ललवाणी, भास्कर जाधव, राजेंद्र मुनोत, दिपक कर्नावट, मंगेश लोळगे, सुर्यकांत महाजन, जितेंद्र पढदरीया, किशोर शर्मा, सखाराम शेळके, पारस लुनावत, वर्धमान खिंवसरा, मदनलाल अग्रवाल, जितेंद्र लोढा, गोटु संचेती, लईक अहेमद, हरीओम धुप्पड, अनिल गुप्ता, महेश शेटे, राजेंद्र तापडीया, तसेच माजलगाव येथील अध्यक्ष – सुरेंद्र रेदासणी, सुनील भांडेकर, संजय सोळंके, धनराज बंब, अनंत रुद्रवार, संतोष अब्बड, कपिल पगारीया, मेहता, गणेश लोहीया, परळी येथील अध्यक्ष – माऊली फड, नंदुसेठ बियाणी, संदिप लाहोटी, रिकबचंद कांकरीया, सुरेश आगवान, बबलु कच्ची, रमाकांत निर्मळ, पवार, विष्णु देवशेटवार, गेवराई येथील प्रताप खरात, संजय बरगे, अंबाजोगाई येथील ईश्वरप्रसाद लोहीया, दत्तप्रसाद लोहीया, भारत रुद्रवार, श्रीनिवास हराळे, सुभाष बडेरा, रिकबचंद सोळंकी, पाटोदा येथील अजित कांकरीया, बाळू जाधव, सुभाष कांकरीया, कलीमभाई, केज येथील – महादेव सुर्यंवशी, धारुर – अशोक जाधव, वडवणी – विनायक मुळे, आष्टी – संजय मेहेर, शिरुर – प्रकाश देसर्डा व इतर बीड शहर व जिल्हा व्यापारी संघटनेच्या सदस्यांनी आभार मानले आहेत.