लाठीचार्ज प्रकरणातील पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना पाठवले सक्तीच्या रजेवर
अप्पर पोलीस अधीक्षक व डीवायएसपी यांची तडकाफडकी बदली
लाठीचार्जप्रकरणाची सखोल चौकशी करून दोशींवर करणार कठोर कारवाई-मुख्यमंत्री
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटे येथे मराठा आरक्षणासाठी बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलीसांनी लाठीचार्ज करत गोळीबार केला, या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र या घटनेचे निषेध करत असल्याने ठिकठिकाणी या घटनेला विरोध होत आहे. याच अनुषंगाने आज बुलडाणा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेवून जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले, यासह अप्पर पोलीस अधीक्षक व डीवायएसपी यांची तडकाफडकी बदली केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे दोशी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.