प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाटीचार्ज केल्यानंतर या घटनेचा सर्वत्र निषेध नोंदला जात आहे. याच घटनेच्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे. मराठा व्यापारी महासंघाने बीड जिल्हा बंदला पाठिंबा दिला आहे. व्यापारी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष संतोष सोहणी, व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांनी संघाच्या वतिने पाठिंबा दिला आहे.