*श्वसन नलिकेत अडकलेला हरभरा काढला
प्रारंभ वृत्तसेवा
बीड-रोजच्या दिनचर्येत कधी काय होईल ते सांगता येत नाही,एका दिड वर्षाच्या बाळाच्या तोंडातून हरभऱ्याचा दाणा थेट श्वसन नलिकेत जाऊन अडकला,बाळाला स्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने घाबरलेल्या त्याच्या आई वडिलांनी डॉ ज्ञानेश्वर रुईकर यांच्या दवाखान्यात आणले डॉक्टरांनी बाळाला तपासल्यावर ऑपरेशनचा निर्णय घेतला आणि तातडीने फुफ्फुसात अडकलेला हरभरा काढला आणि बाळाचे प्राण वाचले
बीड जिल्ह्यातील जाधववाडी, या गावातील जाधव दाम्पत्याच्या दीड वर्षे चा बाळास 27 मार्च रोजी दुपारी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांनी बाळास बालरोगतज्ज्ञ डॉ. वैभव मोटे यांना दाखवले असता त्यांनी बाळाच्या छातीमध्ये डाव्या बाजूस काहीतरी अडकल्याची शंका व्यक्त केली व कान नाक घसा तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर रुईकर यांना दाखवण्यास सांगितले.
डॉ. रुईकर यांनी बाळास तपासले असता अडकलेल्या वस्तूमुळे, डावे फुफुस बंद असल्याचे लक्षात आले व ती वस्तू ऑपरेशन द्वारे काढणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.बाळाच्या आईवडिलांच्या संमतीने बाळास रात्री अडीच वाजता ऑपरेशन थिएटर मध्ये घेण्यात आले, व याप्रसंगी भुलतज्ञ डॉ. श्रीकांत मोराळे यांनी धोका पत्करून बाळास भूल दिली.
डॉ. रुईकर यांनी ही अडकलेली वस्तू ही 7 मिलिमीटर चा फुगलेला हरभरा असल्याचे लक्षात आल्यानंतर, तो हरभरा, फुफुसाच्या आतच त्याचे दोन भाग करून व त्यावरील आवरण वेगळे करून काढण्याची नाजूक व कठीण शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पाडली.
या विषयी बोलताना डॉ. रुईकर म्हणाले की अश्या लहान बाळावर या प्रकारची शस्त्रक्रिया ही गुंतागुंतीची, नाजूक व धोकादायक असते.यशस्वी ऑपरेशन झालेल्या या बाळाच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरीलरील समाधान हे डॉक्टर आणि स्टाफ साठी खूप प्रेरणादायी ठरते.
या ऑपरेशन साठी, हुशार आणि प्रसिद्ध भुलतज्ञ डॉ. श्रीकांत मोराळे, यांनी विशेष परिश्रम घेतले. बालरोगतज्ज्ञ डॉ. वैभव मोटे, डॉ. प्रफुल्ल सुस्कर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
बाळाच्या आईवडिलांनी डॉ. रुईकर व त्यांच्या टीम चे आभार मानले आहेत.