बीड आणि शिरुर तालूक्यातील अग्रीम पीक विम्यापासून वंचित शेतकर्यांना तात्काळ लाभ द्या-खांडे, मस्के, गवते
बीड प्रतिनिधी: बीड तालुक्यातील तसेच शिरूर कासार तालुक्यातील काही मंडळातील शेतकर्यांना अग्रीम पीक विमा पासून वंचित ठेवल्याबद्दल आज महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव गवते यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकार्यांची भेट घेत त्यांना बीड आणि शिरुर तालूक्यातील अग्रीम पीक विम्यापासून वंचित शेतकर्यांना तात्काळ लाभ मिळवून द्यावा असे निवेदन दिले.
महायुतीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव गवते यांनी म्हटले आहे की, बीड तालूक्यातील पाली,म्हाळस जवळा, नाळवंडी आणि पाली आणि शिरुर तालूक्यातील खालापुरी, पाडळी व खोकरमोहा या मंडळातील खरीप हं. मुग, सोयाबीन, उडीद, कपाशी,तुर हे करपण्याच्या अवस्थेत आहे.कृषिमंडळात पेरणी नंतर दमदार पाऊस पडला नसल्याने व कुठेतरी थोडीशी भूरभर आल्याने शासनाच्या 21 दिवसाचा खंड हा निकष पूर्ण होत नसल्याचे कारण पुढे करून पीक सर्वेक्षण नाकारण्यात आले होते. त्यामुळे अग्रीमपीकविमा मिळण्यासाठी समस्या निर्माण झाली आहे. अग्रीम पीक विमा योजनेत वरील मंडळांचा समावेश करावा अशी मागणी करण्यात आली.
बीड तालूक्यातील पाली,म्हाळस जवळा, नाळवंडी आणि पाली आणि शिरुर तालूक्यातील खालापुरी, पाडळी व खोकरमोहा मंडळातील पीके करपली आहेत.पंरतू पर्जन्यमापक यंत्राचे व 4 मी.मी.पावसाचे कारण देत विमा व शासनाच्या माध्यमातून मिळणार्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तरी कालबाह्य निकषावर सर्वेक्षण न करता महसुली व कृषियंत्रने कडून गावनिहाय नमुना पीक सर्वेक्षण करून पावसाअभावी शेतकर्यांना झालेला खर्च तरी शासनाच्या व पीकविमा मंजूरी तून मिळून काहिसा दिलासा देण्यासाठी सहकार्य करावे.पर्जन्यमापक यंत्राच्या अनेक त्रुटी आहेत.मंडळातील पर्जन्यमान हा निकष आता कालबाह्य होत आहे.पर्जन्मान असंतुलनामुळे शिवारा-शिवारात पावसात बदल होतो.तर मंडळातील सर्व गावांमध्ये समान पाऊस हा निकष घातक आहे. त्यामुळे वरील तीनही मंडळाचा अग्रीम पीक विमा योजनेत समावेश करावा अशी मागणी करण्यात आली आहे. महायुतीच्या शिष्टमंडळात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक बापू खांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव गवते, भाजपा जिल्हा सचिव नवनाथ शिराळे, उपजिल्हाप्रमुख जयसिंग मामा चूंगडे, परमेश्वर नाना तळेकर, तालुकाप्रमुख संतोष घुमरे, युवा सेना जिल्हाप्रमुख अजय सुरवसे, सुनील सोनवणे, बालाजी पवार,नंदकुमार कुटे, युवासेना उपजिल्हाप्रमुख पांडुरंग गवते, रामा बांड, पप्पू शिंदे,वैभव शिंदे यांच्या सह आदी उपस्थित होते.
चौकट‘त्या’ मंडळाचा लवकरच नव्या यादीत समावेश- जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे
अग्रीम पीक विम्यापासून वंचित शेतकर्यांच्या प्रश्नी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क केला असता जिल्हाधिकारी मुधोळ यांनी सांगितले की, अग्रीम पीक विम्यासाठी शिरुर व बीड तालूक्यातील काही मंडळांचा समावेश नव्हता. परंतु येत्या तीन दिवसात सदरील मंडळांचा समावेश करुन नवीन यादी जाहिर करण्यात येणार आहे.शेतकर्यांवर अन्याय होणार नाही. त्यामुळे त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.