Beed : सध्याच्या परिस्थीतीवर पाऊस नसल्याकारणाने बीड जिल्हयात हालाकीची परिस्थीती निर्माण झाली आहे. शेतकरी, मजुर व इतर क्षेत्रात ही पाऊस नसल्याने हालाकीची स्थिती असुन, इथुनपुढे पाऊस पडलाही तरी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही. त्यामुळे त्यांच्या पाल्यांचे शिक्षणाची फीस माफ करावी. अशी जिल्हा प्रशासनास विनंती आहे की, आपन शासन दरबारी सर्वसामान्य शेतकरी व नागरीकांच्या व्याथा मांडून न्याय दयावा ही विनंती. जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
सध्या खाजगी शिकवणीची फिस ही आभाळा ऐवढी झालेली आहे. त्यावर नियंत्रण ठेवुन सर्वसामान्यांच्या पाल्यांना कुठेतरी शिक्षणासाठी मदत व्हावी. व शासनाने खाजगी क्लासेस मध्येही फीस माफी करावी. विद्याथ्र्यांना शिक्षणासाठी सवलत द्यावी. शेतकरी राजा पाऊस नसल्याकारनाणे परेशान असून, सर्वसामान्य व मजुर परेशान असल्यामुळे त्यांना मजुरी मिळत नाही व त्यामुळे आपल्या लेकराची फिस भरण्याचा खुप मोठा पेच निर्माण त्यांच्यासमोर झाला आसुन, शिक्षण संस्था व खाजगी क्लासेस फिससाठी विध्याथ्र्यांना तगादा लावत आहेत. त्यामुळे मे. साहेबांना ही गंभीर बाब लक्षात घेवुन फिस माफीससाठी शासन दरबारी आमची मागणी पाठवावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.