आज जिल्ह्यात सर्वाधिका रुग्ण, बीड तालुक्याची चिंता वाढली
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले आहे, माञ जिल्ह्यात कोरोना लाॅक होण्याचे नाव घेत नाही. आज जिल्ह्यात तब्बल ३८६ नव्या रुग्णांची भर पडली तर बीड तालुक्यात १७२ रुग्ण वाढले. लाॅकडाऊन करुनही रुग्ण वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
आज दुपारी आरोग्य विभागाकडुन २२०९ रिपोर्टचा अहवाल प्रात्प झाला, यात १८२३ रुग्ण निगेटिव्ह आले तर ३८६ रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले. यात अंबाजोगाई ७५,आष्टी ४१, बीड १७२,धारुर ०९, गेवराई १३, केज ०९, माजलगाव १४, परळी २९, पाटोदा ११, शिरुर ०६ व वडवणी ०७ असे एकूण ३८६ रुग्ण जिल्ह्यात वाढले. सर्व सामान्यांनी नियमांचे पालन केले नाही तर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आता बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.