नूतन सीईओ अविनाश पाठक यांनी पदभार घेताच जिल्ह्यातील पशुधनाच्या सुरक्षेपासून केली कामास सुरुवात
प्रारंभ । वृत्तेसवा
बीड : जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून अविनाश पाठक यांनी काल सायंकाळी पद्भार स्विकारला. आज त्यांच्या कामाचा पहिला दिवस असल्यामुळे आज सकाळी दहा वाजता त्यांनी ‘माझा देश माझी माती’ या अभियानाअंतर्गत येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना शपथ दिली. यानंतर त्यांनी बैठक घेत या बैठकीत जिल्ह्यातील पशुधनाला कसे संरक्षण देता येईल या अनुषंगाने पुढाकार घेत गाव तिथे जनावरांसाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गोठा असावा या अनुषंगाने कामास सुरुवात केली आहे. त्यांनी पशुधनापासून सुरूवात केल्यामुळे ते अजून कोणकोणत्या कामावर जिल्ह्यात फोकस करतात हे पाहणे गरजेचे आह. यासह बैठकीत त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना करत येथे कामच करावे लागेल नसता कारवाईस सामोरे जावे लागेल असा दमही दिला. यावेळी जि.प.चे संबंधित अधिकारी-कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते.
जिल्हा परिषद याठिकाणी सीईओ म्हणून अजित पवार यांनी चांगले काम करत ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी मोठा पुढाकार घेतला परंतु जलजीवनमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाल्याचा त्यांच्यावर ठपका झाल्यानंतर काही प्रमाणात त्यांच्यावर नाराजीचा सूर निर्माण झाला होता. या सर्व बाबींच्या अनुषंगाने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. यानंतर त्यांच्या जागी सीईओ म्हणून अविनाश पाठक यांनी पद्भार घेतला, आज त्यांचा पहिला दिवस असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकजणांना जिल्हा परिषदेत उपस्थिती दर्शवली होती. परंतु हार-तुरे घेण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. त्यांनी आज सकाळी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेवून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. जि.प.च्या अंतर्गत अनेक विभाग येत असल्यामुळे जिल्हा परिषदेला मोठे महत्त्व आहे. सध्या जि.प.वर प्रशासक असल्यामुळे सीईओ यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने सीईओ अविनाश पाठक हे जिल्ह्यात सकारात्मक काम करतील अशी अपेक्षा आहे.