प्रारंभ वृत्तसेवा
बीड : गेल्या दोन दिवसापुर्वी बीड ग्रामिण पोलीस ठाण्यात एका युवकाने फिर्याद दिली होती की, बँकेत पैसे घेऊन जात असताना अज्ञात चोरट्यांनी माझ्या दुचाकीला धडक देत माझ्या जवळचे दिड लाख रुपये लंपास केले. यानंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरु केला होता. फिर्यादीच्या बोलण्यात सत्यता न दिसल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेला फिर्यादीवरच संशय होता. यात सविस्तर तपास केल्यानंतर फिर्यादीनेच कबूल केले की, मी ऑनलाईन गेम मध्ये दिड लाख रुपये हरलो होते, घरी काय सांगावे म्हणून मी चोरी झाल्याचा बनाव केला. स्थानिक गुन्हे शाखेमुळे हा चोरीचा बनाव उघडा पडला.
नवनाथ संगम धुमाळ वय 30 (रा. काळेगांव हवेली ता.जि.बीड) यांनी सोमवारी (ता. 07) बीड ग्रामिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, वडवणीकडे बँकेत पैसे भरण्यासाठी जात असताना, माझ्या मागून येणाऱ्या दुचाकीने मला धडक देऊन बळजबरीने पैशाची पिशवी लंपास केली. अशी फिर्याद बीड ग्रामिण पोलीस ठाण्यात नोंद केली होती. यानंतर या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरु. धुमाळ यांच्या बोलण्यात सत्यता न दिसल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेला धुमाळ यांच्यावर संशय आला होता. यानंतर यात रितसर तपास केल्यानंतर धुमाळ यांनीच कबूली दिली की, मी दिड लाख रुपये ऑनलाईन गेम मध्ये हरल्यामुळे मी पैसे चोरीला गेल्याचा बनाव केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या योग्य तपासामुळे हा बनाव उघडा पडला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे विकी सुरवसे, अशोक कदम यांनी केली.