सीईओ अविनाश पाठक यांनी आज पदभार घेतल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या अनेकांना वापस यावे लागले
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : बीड जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून अविनाश पाठक यांनी आज (ता. ०८) संध्याकाळी पदभार घेतला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी त्यांच्या कॅबिनमध्ये गर्दी केली होती. परंतु अविनाश पाठक यांनी पुष्पगुच्छ घेण्यास नकार दिल्यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने वापस जाण्याची वेळ आली. यामुळे तुम्ही सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यास जात असाल तर तुम्हाला पुष्पगुच्छ घेऊन न जाता एखादे पुस्तक, पेन किंवा इतर शैक्षणिक साहित्य घेऊन जावे लागेल. सीईओ पाठक यांनी पहिल्याच दिवशी पुष्पगुच्छ न घेतल्यामुळे अनेकांना नाराज केले. परंतु त्यांनी यातुन एक चांगला संदेश सुद्धा दिला.
जिल्हा परिषद चे सीईओ अजित पवार यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी संभाजीनगर येथील अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली होती. आज सायंकाळी अविनाश पाठक यांनी बीड जिल्हा परिषद सीईओ म्हणून पदभार स्वीकारला, यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी जिल्हा परिषद मध्ये गर्दी केली होती. परंतु अविनाश पाठक यांनी पुष्पगुच्छ घेण्यास नकार दिल्यामुळे मात्र अनेकांची तारांबळ उडाली. मोठ-मोठे पुष्पगुच्छ घेऊन आलेले राजकीय क्षेत्रातील नेते, ठेकेदार यासह इतर मंडळींना मात्र पहिल्याच दिवशी शुभेच्छा न देताच रिकाम्या हाताने वापस जावे लागले. ज्यांनी ज्यांनी पुस्तक आणले होते, त्यांच्या शुभेच्छा मात्र अविनाश पाठक यांनी स्वीकारला. तुम्ही सुद्धा सीईओ अविनाश पाठक यांना शुभेच्छा देण्यात जात असाल तर तुम्हाला पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तक किंवा इतर शैक्षणिक साहित्य घेऊन जावे लागेल, तरच तुमच्या शुभेच्छा अविनाश पाठक स्वीकारतील नसता तुम्हालाही रिकामी हाती वापस यावे लागेल.