जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट ठेवीदारांना ना.तानाजी सावंतांचा दिलासा….
बीड प्रतिनिधी : आज पुणे येथे राज्याचे आरोग्यमंत्री ना तानाजी सावंत यांची जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट ठेवीदार कृती समितीने
काही ठेवीदारांसह भेट घेतली.ना.तानाजीराव सावंत यांनी जवळपास पाऊण तास ठेवीदार कृती समितीसी चर्चा केली .कृती समितीचे अध्यक्ष ॲड.आप्पासाहेब जगताप यांनी
जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट को ऑप. क्रेडिट सोसायटी मधील ठेवीदारांच्या रकमेबाबत झालेल्या घोटाळ्याची व पोलीस तपासाची इत्यंभूत माहिती दिली. मंत्री महोदयांनी ठेवीदारांच्या भावना सहानुभूती पुर्वक जाणून घेतल्या. सदर प्रकरणाची पुर्ण माहिती मुख्यमंत्री मा.ना. एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानावर घालून शासन स्तरावरून पुढील कायदेशीर कार्यवाही तातडीने करण्यात येईल. गरज पडल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री त्यांच्याशी ठेवीदार कृती समिती व ठेवीदारांची प्रत्यक्ष भेट घालून देऊ. ठेवीदारांनी चिंता करू नये. त्यांचा पैसा परत मिळवण्यासाठी शासन स्तरावरून निश्चितपणे प्रयत्न केले जातील. असे दिलासा ना.सावंत यांनी ठेवीदार कृती समितीला दिला. यावेळी कार्याध्यक्ष डॉ.अरविंद काकडे, समिती सदस्य मारूतीराव तिपाले, रविंद्र
पालीमकर इजि.मारूतीराव वनवे, सुहास पाटील, सुर्यभान नवले, तसेच नेकनूर व इट ता. वाशी येथील ठेवीदार सुमारे १०० ठेवीदार उपस्थित होते.