-स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : शहरातील बसस्थानकात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून गुरुवारी (ता. 27) जालना जिल्ह्यातील एका प्रवाशाचे बीड बसस्थानक येथे बस मध्ये चढताना मागच्या खिश्यातील एक लाख रुपये लंपास केले होते. फिर्यादीच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. यांची दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने तपास गतीमान केला होता. अखेर शनिवारी (ता. 29) यातील आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले. आरोपीकडून काही मुद्देमाल ताब्यात घेतला असून अजून काही मुद्देमाल रिकव्हर होण्याची शक्यता आहे.
भास्कर नेमिनाथ आव्हाणे वय 45 (रा. पाणेगाव ता अंबड, जि. जालना) हे कामानिमित्त बीडला आले होते. परतीचा प्रवास करण्यासाठी ते बीड बसस्थानक येथे बस मध्ये बसत असताना, त्यांच्या मागच्या खिश्यातील एक लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. यानंतर आव्हाणे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास गतिमान करत, यंत्रणा कामाला लावली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष साबळे यांना गुप्तमाहितीदारामार्फत माहीती मिळाली होती की, शहरातील अंबिका चौक परिसरात संबंधित चोरटा आहे. यानंतर त्याठिकाणी जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सुभाष अर्जुन गायकवाड रा. शिरापुर धुमाळ ह्या आरोपीकडून एक लाख रुपये हस्तगत करण्यात आले. सदरील आरोपीला शिवाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या टिमने केली.