प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : बीड शहराला नगरपालिकेच्या हद्दीत नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. माजलगाव व बिंदुसरा धरणातून हा पाणीपुरवठा होतो. गेल्या काही वर्षांपासून बीडकरांना पाण्यासाठी पंधरा ते 20 दिवस पाण्यासाठी वाट पहावी लागते. महिन्याला किमान 2 ते 3 वेळा सर्वसामान्यांना नळाद्वारे पाणी मिळते. तर दुसरीकडे जे व्हीआयपी आहेत त्यांना मात्र पाईपलाईनच्या मेन कनेक्शनमधून नळजोडणी दिल्यामुळे त्या व्हीआयपींना मात्र 24 तास पाणीपुरवठा आहे. यावरून अंधारेबाई हा भेदभाव बरा नव्हे असं म्हणण्याची वेळ बीडकरांवर आली आहे.
बीड शहराला माजलगाव, बिंदुसरा या दोन धरणातून पाणीपुरवठा होतो. परंतु नगरपालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्यांना पाण्यासाठी पंधरा पंधरा दिवस वाट पहावी लागते. यात सुद्धा पाणी कोणत्या वेळेत येईल याचे नियोजन नसते यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वाट पहात बसण्याची वेळ नगरपालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे आली आहे. पंधरा दिवसाला पाणी येत असल्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवण करून ते पाणी पंधरा दिवस वापरावे लागते. तर दुसरीकडे मात्र शहरातील काही व्हीआयपींना मुख्य लाईनमधून नळकनेक्शन नेमके कोणत्या नियमात दिले? हा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे. तरी या गंभीर बाबींकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देवून ज्यांनी कोणी मेन लाईनमधून मेन कनेक्शन दिले आहे, व ज्यांनी हे कनेक्शन घेतले आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.