MPDA कायद्याअंतर्गत पोलीस अधिक्षकांनी केली कारवाई
प्रारंभ वृत्तसेभा
बीड : बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा, यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे चांगले काम करत आहेत. याच अनुषंगाने गेवराई तालुक्यात दहशत माजवणार्या दोन जणांविरोधात एमपीडीए कायद्या अंतर्गत कारवाई करत, त्या दोघांची हर्सूल कारागृहात रवानगी केली, या कारवाईमुळे गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांवर जरब बसणार असून जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी याचा फायदा नक्कीच होईल. यासह अजूनही अशा कारवाया होणे अपेक्षित आहे.
बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुंडगिरीचे व वाळु माफियाचे समुळ उच्चाटन करण्याचा प्रारंभ उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून MPDA कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजिले आहे. या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक, बीड यांचे सुचनेवरुन स.पोलीस निरीक्षक श्री. शंकर वाघमोडे पोलीस ठाणे तलवडा यांनी दिनांक 13/07/2023 व 14/07/2023 रोजी अनुक्रमे इसम नामे 1) गोरख सदाशिव काळे वय 31 वर्षे 2) लखन तुकाराम काळे वय 38 वर्षे दोन्ही रा. राजापुर ता. गेवराई जि. बीड यांचे विरुद्ध MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रारंभ प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी यांना सादर केला होता. गोरख सदाशिव काळे या स्थानबध्द इसमा विरुध्द पोलीस ठाणे तलवडा येथे एकुण 08 गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये दंगा करणे, रस्ता आडविणे, जबरी चोरी करणे, वाळु गौण खनिज याची चोरी करणे, दुखापत करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, वगैरे अशा स्वरुपाच्या गुन्ह्याची नोंद आहे. त्यापैकी 06 गुन्हे न्यायप्रविष्ट असून 02 गुन्हे पोलीस तपासावर आहेत. तसेच लखन तुकाराम काळे या स्थानबध्द इसमाविरुध्द एकुण 5 गुन्हे पोलीस अभिलेखावर दाखल असून त्यामध्ये रस्ता आडविणे, वाळु गौण खनिज याची चोरी करणे, दुखापत करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, या व अशा स्वरुपाचे गुन्हे पोलीस अभिलेखावर दाखल आहेत. सदरील दोन्ही इसम हे शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे करुन गोदावरी नदी पात्रातील वाळु गौण खनिज याची चोरी करुन साठा करुन चढया भावाने विक्री करत असल्याने पोलीसांची त्याचेवर बऱ्याच दिवसांपासुन करडी नजर होती. या अनुषंगाने हि कारवाई करण्यात प्रारंभ आली. हि कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, उपपोलीस अधिक्षक श्री राजगुरु, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शंकर वाघमोडे, पोउपनि भवर पोह सचिन आलगट, पोअं/पिंपळे सर्व पो. स्टे तलवडा तसेच स्थागुशा बीड येथील पोउपनि खटावकर, पोह अभिमन्यु औताडे, सोमनाथ गायकवाड, मनोज वाघ, विकास वाघमारे, घोडके, चालक कदम यांनी केलेली आहे.