संबंधित मालकावर गुन्हा नोंद न करता थातूर-मातर कारवाई
20 किलो गांजा असताना रेकॉर्डवर मात्र 6 किलो
राजकीय हस्तक्षेपामुळे मुख्य आरोपीवर गुन्हा नोंद नाही
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : पाटोदा येथील एका बड्या नेत्याच्या हॉटेलवर काल पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये मोठी तडजोड झाल्याची माहिती मिळत आहे. याठिकाणी तब्बल 20 किलोचा गांजा असताना सुद्धा पोलीसांनी फक्त सहा किलोचा गांजा दाखवत मुख्य आरोपीला सोडत थातूरमातूर कारवाई केली. यामध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे मुख्य आरोपीला मात्र सोडण्यात आल्याची माहिती आहे. तरी पोलीस अधीक्षकांनी यामध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
पाटोदा शहरातील एका हॉटेलवर काल पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे संबंधित हॉटेल मालकावर गुन्हा नोंद झालाच नाही. विशेष म्हणजे संबंधित हॉटेलमालक गांजाचा व्यापार करत असल्याची माहिती संपूर्ण जिल्ह्याला आहे परंतु कारवाईमध्ये मात्र त्या आरोपीला सोडण्यात आले. हॉटेलमध्ये तब्बल 20 किलोचा गांजा असताना रेकॉर्डवर फक्त सहा किलोचाच गांजा दाखवण्यात आला. यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे संबंधित हॉटेलमालकावर गुन्हा नोंद झाला नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी या प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षकांनी विशेष लक्ष देत या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.