शहर पोलीस ठाण्यात पाच ते सहा जणाविरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : युवा सेनेची जबाबदारी हाती घेत जिल्ह्यासह मराठवाड्यात शिवसेना वाढवण्यासाठी युवा नेते विपुल पिंगळे हे काम करत आहेत, त्यांच्या याच कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांना मराठवाड्याच्या युवा सेनेच्या विभागीय सचिव पदी त्यांची नियुक्ती केलेली आहे. आज बीड शहरामध्ये पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केला. यात युवा नेते विपुल पिंगळे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच पोलीसांनी विपुल पिंगळे यांची तक्रार घेतली असून याप्रकरणी पाच ते सहा जणाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.