Beed : बीड शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर म्हणून बीडची ओळख असुन बीडमध्ये अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेली धार्मिक स्थळे धार्मिक समाधी,बारव,स्तंभ, शिलालेख ,शिल्प स्मारक, ऐतिहासिक घटना घडलेली स्थळे जिल्ह्यात अस्तित्वात असुन अशा काही वास्तूंची तर काहीं घटनाची इतिहासात नोंद आहे परंतु अशा बऱ्याच ऐतिहासिक वास्तूंची पुरातत्व विभागाच्या यादीत नोंदी आढळून येत नाही अशी दुर्लक्षित स्थळे जपण्याची जबाबदारी ही पुरातत्व खात्याची आहे परंतु बीड मधील बऱ्याच ऐतिहासिक वास्तू ज्याच्या नोंदी पुरातत्व खात्याकडे आढळून येत नाही महसूल आणि पुरातत्व विभाग एकमेकांवर याची जवाबदारी ढकलत असल्याने या वास्तूंचे संरक्षण आणि या वास्तू जपण्याची जवाबदारी नक्की कोणाची असा प्रश्न पडला आहे. आज दि.१६ जुलै रविवार रोजी पाली येथील बिंदुसरा धरणाच्या पाण्यात पुरातन नंदी आढळुन आल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी बीड, पोलिस अधीक्षक बीड, तहसीलदार बीड यांना सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे, रामनाथ खोड,हे.भ.प.रामेश्वर जाधव महाराज यांनी केली. ASP सचिन पांडकर व तहसीलदार सुहास हजारे यांना डॉ.गणेश ढवळे यांनी फोनवरून कल्पना दिल्यानंतर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक साबळे, पोलिस उपनिरीक्षक आवारे, पोलिस उपनिरीक्षक रणखांब,पो.हे.मुंढेव बडे घटनास्थळी दाखल झाले, तहसीलदार सुहास हजारे यांच्या आदेशावरून मंडळ अधिकारी शितल काटे यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थळपंचनामा करत जेसीबीच्या सहाय्याने नंदी पाली येथील नागनाथ मंदिरात ठेवण्याचे आदेश दिले.