बीड : अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू आहे या मार्गालगत असलेल्या काही गावांमधून रेल्वे पटरीचे काम सुरू आहे हे करत असताना काही गावांमध्ये पूल बांधण्यात आले आहेत. मात्र हे पूल पुरेशा उंचीचे नसून या ठिकाणी पुलाखालून जाणार्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पुलाच्या खाली असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले जाते त्यामुळे वाहनधारकांना अडचण निर्माण होऊ लागली आहे ही बाब ग्रामस्थांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना निवेदन देऊन हा प्रश्न सोडवण्याची मागणी केल्यानंतर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांशी तातडीने संपर्क साधून हे काम करण्याची मागणी केली होती त्यानुसार रेल्वे पुलाच्या खाली काम सुरू करण्यात आले आहे.
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू आहे या मार्गालगत असलेल्या पोखरी, जरूड, बाभूळ खुंटा व वंजारवाडी येथे रेल्वे पूल आहेत येथून बोरफडी, भवानवाडी, कुटेवाडी, मोंगिरवाडी, कलसंबर आणि येलंबघाट या गावाचा संपर्क होत आहे. जिथे रेल्वे पूल तयार करण्यात आले आहे ते पूल करत असताना पुलाचा खालचा भाग सखल झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाणी साचते त्यामुळे वाहतूक ठप्प होते. या गावच्या ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी करूनही हे काम होत नव्हते मात्र ग्रामस्थांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली तेव्हा माजी मंत्री क्षीरसागर यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन देऊन हे काम करण्याची मागणी केली होती तर कार्यकारी अभियंता यादव उप अभियंता नाईक यांच्याशी संपर्क साधून हे काम तातडीने करण्याची सूचना केली. गावकर्यांच्या वतीने गंगाधर घुमरे, पंजाब काकडे, गोरख दन्ने, अॅड. राजेंद्र राऊत, दत्तात्रय सानप, बिबीशन घुगे, हनुमंत बोरगे, उद्धव येवले, रामचंद्र बहिर, अमोल बहिर, कल्याण जमदाडे, वैजीनाथ बनकर यांनी माजी मंत्री क्षीरसागर यांची भेट घेतली होती, सध्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून ज्या ठिकाणी पुलाची खोली आहे तिथे भराव घालून बाजूने नाला काढून पुलाखाली पाणी साचणार नाही असे काम केले जात आहे त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.