राज्यातील अनेक गुन्हे उघडकिस येणार
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : गेल्या काही दिवसापासून चार चाकी व दुचाकी वाहन चोरीचे प्रमाण वाढले आहे, त्यात चार चाकी वाहन चोरीचे प्रमाण जास्त आहे. या सर्व बाबीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने वाहन चोरी रोखण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. चार चाकी वाहन चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. या चोरट्याकडून राज्यातील विविध गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षण संतोष साबळे यांच्या टीमने केले.
जिल्हयात विविध ठिकाणी घडलेल्या दोन चाकी, चार चाकी वाहन चोरी करणारे आरोपीची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक मा. पोलीस अधीक्षक, बीड यांचे सुचनेप्रमाणे व पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांचे मार्गदर्शनाखाली आहोरात्र परिश्रम घेऊन माजलगाव उपविभागात पेट्रोलींग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना दिनांक ०५.०७.२०२३ रोजी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की, इसम नामे शेख नदीम शेख दाऊत रा. धाड ता. जि. बुलडाणा याने तेलगाव ता. माजलगाव येथुन चोरी केलेली स्वीप्ट डिझायर सध्या वापरत आहे व सदरची गाडी ही MIDC जालना येथील राहते घरासमोर उभी आहे. त्यावरुन स्थागुशाचे पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन पहाणी केली असता सदर ठिकाणी एक इसम पाढऱ्या रंगाच्य स्वीप्ट डिझायर सह मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव शेख नदीम शेख दाऊत रा. धाड ता. जि. बुलडाणा ह. मु. जालना असे सांगुन स्वीप्ट डिझायर बाबत विचारपुस केली असता सदरची गाडी ही दिनांक ११/०६/२०२३ रोजी तेलगाव ता माजलगाव येथुन चोरलेली आहे असे सांगीतल्याने आरोपीस वाहनासह ताब्यात घेऊन पोलीस ठाणे दिंद्रुड येथे गुरन १४० / २०२३ कलम ३७९ भादवि गुन्हयामध्ये हजर केले आहे. पुढिल तपास द्विंदुड पोलीस करीत आहेत. वरील आरोपी विरुध्द यापुर्वी एकुण (०७) गुन्हे दाखल आहे. येवला, सिडको औरंगाबाद शहर, सिन्नर नाशिक, तुळजापुर, सिलोड औरंगाबाद ग्रामीण, देऊळगाव राजा, देऊळगाव राजा येथील वाहन चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कामगिरी श्री नंदकुमार ठाकुर, मा. पोलीस अधिक्षक बीड, श्री सचिन पांडकर, मा. अपर पोलीस अधिक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक संतोष साबळे, सफो/तुळशीराम जगताप, पोह/मनोज वाघ, प्रसाद कदम, पोना/सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, पोशि/सचिन आधंळे, अशोक कदम स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.