लिंबागणेश जि.प.गटातील मान्याचा वाडा येथे शाखाचे जिल्हाप्रमुख खांडेंच्या हस्ते उद्घाटन
बीड प्रतिनिधी : गावागावात शिवसेनेच्या शाखा आणि प्रत्येक घरात शिवसैनिक हे अभियान धडाक्यात सुरु आहे. प्रत्येक गाव,वस्ती, तांड्यावर आपल्याला शिवसेनेच्या शाखा उभारण्याची आवश्यकता आहे कारण शिवसेनेच्या शाखाच या खर्या अर्थाने आपले शक्तीस्थळ असणार आहेत. शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी ठिकठिकाणी शाखा उद्घाटनासाठी प्रयत्न करावेत. यातूनच शिवसेना सदस्य नोंदणी सुध्दा वाढवावी असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले. लिंबागणेश जिल्हा परिषद गटातील
मौजे मान्याचा वाडा येथे मोठ्या उत्साहात शिवसेना शाखेचे उद्घाटन जिल्हाप्रमुख खांडे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी खांडे यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधला.
बीड तालूक्यातील मान्याचा वाडा येथे बुधवार दि..28 जून रोजी शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या हस्ते करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख जयसिंग मामा चूंगडे, उपजिल्हाप्रमुख गणेश बप्पा उगले(गेवराई विधानसभा क्षेत्र),उपजिल्हाप्रमुख परमेश्वर नाना तळेकर(बीड विधानसभा क्षेत्र), महिला आघाडीच्या गोरे ताई, आंधळे ताई, माने ताई, शहरप्रमुख कल्याण कवचट, बापू माने, गावातील शाखाप्रमुख मारुती माने, उपशाखाप्रमुख कल्याण माने, बारीकराव चव्हाण, नारायण चव्हाण, जनार्दन माने, ज्ञानदेव माने, राम माने, शिवाजी चव्हाण, पंजाब माने, भाऊसाहेब माने, सखाराम माने, हनुमान माने, शुभम माने, संदिपान कळसुले, अविनाश कळसुले, राम चव्हाण, महिला रंजना माने, आशाबाई माने, दैवशाला कळसूले, सविता माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधताना जिल्हाप्रमुख खांडे म्हणाले शिवसेना हा पक्ष खर्या अर्थाने सर्वसामान्यांना आपला वाटणारा,हक्काचा वाटणारा पक्ष आहे. सर्वसामान्य, शेतकरी, उपेक्षीत, वंचित यांच्या समस्या सोडवण्याचे काम शिवसैनिकांनी केले पाहिजे. शिवसेना पदाधिकारी असो की शिवसैनिक प्रत्येकाने घराघरापर्यंत जावून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी ज्या योजना लोकहितार्थ सुरु केल्या आहेत त्याची माहिती द्यावी. शिवसेना पक्ष सदस्य नोंदणी अभियानात जास्तीत जास्त सदस्य करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाप्रमुख खांडे यांनी केले. या प्रसंगी मन्याचीवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.