तकीया कब्रस्तानच्या विकासासाठी एक कोटींचा प्रस्ताव-डॉ योगेश क्षीरसागर
बीड/प्रतिनिधी
माझ्या राजकीय आयुष्यात मी सर्वच समाज घटकांना बरोबर घेऊन विकासाचे राजकारण साधले आहे,हे मी नाही तर माझे काम बोलत आहे निवडणुकीच्या काळात पंख छाटण्याचा प्रयत्न केला असला तरी आमची हिम्मत खचली नाही आणि ती खचूही दिली नाही, सत्ता येते आणि जाते मात्र प्रत्येक समाजाशी जुळलेली नाळ कधी तुटू दिली नाही असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे
जिल्हा नियोजन अंतर्गत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बागवान समाजासाठी सामाजिक सभागृह शादी हॉल साठी आपल्या प्रयत्नातून 50 लक्ष रुपयाचा निधी पाठपुरावा करून मंजूर करून घेतला या शादी हॉलच्या बांधकामाचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर माजी नगरसेवक मुखीद लाला, एकबाल भाई, शुभम धूत, अक्रम बागवान, सय्यद खाजा, नितीन जायभाय, मुन्नाभाई इनामदार, नाबिल जमा, रौफभाई ज्वारीवाले बाबा खान, इरफान बागवान, इसा चाऊस, आदि उपस्थित होते,प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक रफिक सर यांनी केले
बागवान समाजासाठी होत असलेले हे सभागृह समाजासाठी खूप उपयोगी पडणार आहे, काकू नाना आडत मार्केट मधील बागवान समाज व इतर बागवान समाजाची ही मागणी जयदत्त अण्णांनी पूर्ण केली, अण्णा हा एकमेव नेता असा आहे की ज्याचे सर्व समाज घटकाशी एक वेगळे नाते जोडले गेले आहे,कित्येक वर्षापासून हा समाज अण्णांच्या आणि अध्यक्षांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, समाजाच्या प्रत्येक प्रश्नासाठी जयदत्तअण्णा प्राधान्य देऊन प्रश्न सोडवतात,आमचा पक्ष म्हणजेच जयदत्तआण्णा आहे, एवढा मोठा निधी हा प्रथमच या समाजासाठी मिळाला आहे,त्यामुळे समाज बांधव समाधानी आहेत, 11 हजार स्क्वेअर फुट जागा उपलब्ध करून देऊन माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी खूप मोठे काम केले आहे आडत मार्केट आणि तकिया मज्जीद मध्ये देखील जागा उपलब्ध करून दिली खानखा सभागृहासाठी देखील 11हजार स्क्वेअर फुट ची जागा उपलब्ध करून दिली. जो आमचा विकास करतो त्याच्या पाठीशी समाजाने उभे राहिले पाहिजे ज्यांची नियती आणि नीती साफ आहे ते एकमेव नेतृत्व म्हणजे जयदत्त क्षीरसागर आहेत अशा प्रतिक्रिया उपस्थित मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या
यावेळी बोलताना डॉ योगेश क्षीरसागर म्हणाले बागवान समाज आमच्या पाठीशी आहे हीच खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची आहे विकासाची प्रक्रिया ही चालत असते पण दिलेला शब्द पूर्ण करणे आणि विकास करून दाखवणे हे प्रत्येक समाजासाठी खूप आनंददायी आहे स्वर्गीय काकूंच्या काळापासून हा समाज आमच्याबरोबर आहे हा समाज कार्य मग्न असणारा समाज आहे प्रत्येक निवडणुकीत हा समाज आमच्या पाठीशी भक्कमपणे उभा असतो त्यामुळेच अण्णासाहेब आणि अध्यक्ष साहेब दोघांचेही विशेष लक्ष असते तकीया मज्जीद कब्रस्तानच्या जागेचा विकास करण्यासाठी एक कोटींचा प्रस्ताव दाखल करण्यात आला असून आगामी काळातही काकू नाना आडत मार्केटच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू असे ते म्हणाले
यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की माझ्या राजकीय वाटचालीत बागवान समाज मोठ्या हिमतीने आणि ताकतीने माझ्या पाठीशी उभा राहिला आहे झालेल्या निवडणुकीत पंख छाटण्याचा प्रयत्न केला असला तरी आमची हिम्मत अजून खचलेली नाही ती खचू ही दिली नाही, सत्ता येते आणि जाते पण प्रत्येक समाजाशी असलेली जवळीकता आम्ही कधी सोडली नाही प्रत्येक समाजाची अपेक्षा असते आपल्याला व समाजाला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे प्रश्न सुटायला पाहिजेत त्यासाठी या समाजाच्या पाठीशी आपण उभे असतो, काकू नाना आडत मार्केटच्या विविध विकासासाठी आपण एक कोटी रुपयाचा प्रस्ताव दाखल केलेला आहे तोही आपण मंजूर करून घेऊ यापूर्वी अनेक प्रश्न गंभीर बनले होते मात्र आपण सामंजस्याने ते सोडून घेतले आहेत, आडत मार्केट समोरचा मोठा रस्ता हा लवकरच पूर्ण होणार असून दिशाभूल करून नारळ फोडून प्रश्न सुटत नसतात ते सोडवावे लागतात ज्या कामाला निधीच नाही ते काम होईलच कसे असा प्रश्न उपस्थित करून खासबाग ते मोमीनपुरा पुलाचे उद्घाटन हा केवळ राजकीय स्टंट काही जणांनी केला होता या प्रश्नात आपण स्वतः लक्ष घालून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली ती देखील लवकरच मंजूर होऊन या पूलाचे काम देखील आपण करून घेऊ मात्र हे होत असताना अफवांवर समाजाने विश्वास कितपत ठेवावा हा देखील एक प्रश्नच आहे समाजाचे प्रश्न खऱ्या अर्थाने कोण सोडू शकतो याचा विचार त्या त्या समूहाने करायला हवा अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या नगरपालिकेत विकासाची कामे करण्यासाठी भरीव निधी मंजूर करून आणावा लागतो तरच त्या त्या प्रभागात विकास कामे होतात, उत्पन्न 50 पैसे आणि खर्च एक रुपया अशा परिस्थितीत शासन दरबारी पाठपुरावा करून वेगवेगळ्या योजनेतून आपण निधी उपलब्ध करून घेऊन विकास कामे करत असल्याचे ते म्हणाले यावेळी बागवान समाजातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते