पोलीस उपअधिक्षक शंकर शिंदे यांच्या टिमची कारवाई
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात दिवसेंदिवस भ्रष्टाचाराच्या घटना वाढल्या असून यात पोलीस विभाग पुढे असल्याचे होत असलेल्या कारवायातून दिसत आहे. दोन दिवसापुर्वी वडवणी पोलीस ठाण्यात घटना उघड झाल्यानंतर परत आज शिरुर पोलीस ठाण्यातील घटना समोर आली आहे. अदखलपाञ गुन्ह्यात मदत करण्यासाठी संबंधित पोलीस कर्मचार्याने दहा हजाराची मागणी केली होती, तडजोडी अंती पाच हजाराची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर बीड एसीबीच्या टिमने कर्मचार्याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला.
शिरुर पोलीस ठाण्यातील शिवाजी श्रीराम सानप वय ४१ यांनी संबंधित तक्रारदाराकडून अदखपाञ गुन्ह्यात मदत करण्यासाठी दहा हजाराची मागणी केली होती. तडजोडी अंती पाच हजारात तडजोड झाली, तडजोड झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सानप यांना ताब्यात घेत गुन्हा नोंद केला. हि कारवाई पोलीस अधिक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधिक्षक विशाल खांब, पोलीस अधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस यांनी व त्यांच्या टिमने केली.