प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना गेल्याअनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे. आज सुद्धा प्रलंबित मागण्यासाठी या संघटनेने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता. या मोर्चात भरउन्हात मोठ्या संख्येने महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. प्रलंबित मागण्यांचे निवेदन यावेळी प्रशासनास देण्यात आले.
शालेय पोषण आहार कामगाराचे विविध प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहेत यासह इतरही मागण्या प्रलंबित आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक असलेली सेंटर किचनप्रणाली बंद करण्यात यावी, केरळ राज्याच्या धर्तीवर शालेय पोषण आहार कामगारांना 18 हजार रुपये मानधन देण्यात यावे, विनाचौकशी कामगारांना कामावरून कमी करू नये, दहा महिने ऐवजी बारा महिने शालेय पोषण आहार कामागरांना मानधन देण्यात यावे, एक एप्रिलपासून झालेली मानधनवाढ तात्काळ कामगारांच्या खात्यात जमा करण्यात यावी यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी जि.प.वर मोर्चा काढण्यात आला होता.