जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंकडे लोकसभेचीही जबाबदारी
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने भाजपाने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली असून या निवडणूकीत कशाप्रकारे यश मिळेल यासाठी चोख नियोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा व एक लोकसभेची जबाबदारी संबंधित नेत्यावर देण्यात आली आहे. यामध्ये लोकसभा प्रमुख म्हणून राजेंद्र मस्केंकडे ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे तर बीड विधानसभेची जबाबदारी सुद्धा मस्केंकडेच देण्यात आली आहे. यासह परळी विधानसभेची जबाबदारी खा.प्रितम मुंडे, आष्टी मतदारसंघाची जबाबदारी आ.सुरेश धस, माजलगाव मतदारसंघाची भाजपाचे नेते मोहन जगताप, केज मतदारसंघाची जबाबदारी शरद इंगळे, गेवराई मतदारसंघाचे जबाबदारी शामसुंदर कुंड यांच्याकडे देण्यात आली आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून मस्केंचे चोख काम
भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून राजेंद्र मस्के यांनी आतापर्यंत पक्षाने दिलेले प्रत्येक काम चांगल्या प्रकारे करून जिल्ह्यात पक्ष कसा मजबूत राहिल यासाठी आतापर्यंत चांगले काम केले. यामध्ये सहाही मतदारसंघातील नेत्यांसोबत सुसंवाद ठेवत पक्ष वाढवण्याचे मोठे काम केले. यासह आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने सुद्धा मस्केंवर पक्षाने मोठी जबाबदारी दिली असून ती जबाबदारी सुद्धा ते पार पाडतील असा विश्वास पक्षाला आहे.