सव्वा लाखाचा गांजा जप्त, पंकज कुमावत व युसूफ वडगाव पोलीसांची कामगिरी
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : केज तालुक्यातील युसूफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत एकजण मिरचीच्या शेतात गांजाची लागवड केली असल्याची माहिती आयपीएस पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. यानंतर पंकज कुमावत यांनी व युसूफ वडगावचे पो.नि.योगेश उबाळे व त्यांच्या टिमने त्याठिकाणी जावून छापा मारत बेकायदेशीररित्या केलेल्या गांजाची लागवड प्रकरणी एकजणास ताब्यात घेत सव्वा लाख रुपयाचा गांजा जप्त केला.
केज तालुक्यातील युसूफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील चिंचपूर येथील शेतकरी सत्यपाल ग्यानबा घुगे यांच्या मिरचीच्या शेतात काही झाडे गांजाची लावली होती, याची माहिती आयपीएस पंकज कुमावत यांना मिळाली होती, यानंतर पंकज कुमावत यांनी ही माहिती पो.नि.योगेश उबाळे यांना दिली, यानंतर या दोघांनी त्याठिकाणी जात शेतातील 24 किलो 630 ग्रॅम अंदाजे किंमत 124000 रुपये हा मुद्देमाल जप्त करत शेतकरी घुगे यांच्यावर युसूफ वडगाव पोलीसात गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयपीएस पंकज कुमावत, पो.नि.योगेश उबाळे यांच्या टिमने केली.