शिवतीर्थावर फक्त शिवराज्याभिषेक सोहळाच नव्हे तर शिवरायांच्या विचाराची पर्वणी!
बीडचे शिवतीर्थ बनले शिवविचाराचे तीर्थ!
शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडून उत्कृष्ट नियोजन
पुढच्या वर्षी 501 जोडप्यांच्या हस्ते महाराजांचे पूजन करण्याची घोषणा
बीड / प्रतिनिधी
बीड येथे गेल्या वर्षीपासून शिवतीर्थावर सुरू करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या महोत्सवासाठी अठरापगड जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून त्यांच्या हस्ते पूजन केलं जातं पहिल्या वर्षी 151 जोडप्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तर यावर्षी 201 जोडप्यांच्या हस्ते शिवरायांचे पूजन करून राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले. अशी माहिती शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडून देण्यात आले आहे.
उत्सव नात्यांचा, उत्सव आपुलकीचा, उत्सव आपल्या रयतेच्या राजाचा… छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त गेल्या वर्षीपासून बीडच्या शिवतीर्थावर शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते अठरापगड जाती धर्मातील जोडप्यांच्या हस्ते शिवरायांचे पूजन करण्यात येत त्यानंतर रक्तदान शिबिर तसेच येणाऱ्या शिवभक्तांसाठी प्रसादाचे देखील नियोजन करण्यात आले होते.. यावेळी जिजाऊ वंदना महाराजांचे पूजन विधिवत मंत्रोपचार देखील करण्यात आले परंतु ते देखील युवतींच्या माध्यमातून करण्यात आले.. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळा शिवतीर्थावर आगळ्या वेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडून विशेष परिश्रम घेण्यात आले होते तसेच समितीकडून पुढच्या वर्षीचा राज्याभिषेक सोहळा 501 जोडप्यांच्या हस्ते महाराजांचे पूजन करून करण्यात येईल अशी देखील घोषणा करण्यात आली.
* शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात
* प्रथम सात वाजल्यापासून 201 जोडप्यांना फेटा बांधायचा कार्यक्रम सुरू झाला..
* बरोबर आठ वाजता शंकर वादन श्री प्रदीप दोडके यांच्या कडून करण्यात आले..
* लगेच जिजाऊ वंदना हरिभक्त पारायण प्रतिक्षा ताई करडूले
महाराष्ट्र गीत घेण्यात आले..
* महाराजांचे पूजन व विधी व मंत्रपचार व सूचना स्नेहल कागदे, कु.इशिका किशोर पिंगळे, कु.साक्षी सोळुंके, तन्वी काळे, वैष्णवी कस्पटे, गौरी क्षीरसागर यांनी केले..
* त्यानंतर लगेच मुख्य मूर्तीचे पूजन शस्त्र तलवार पूजन कवड्याची माळ पूजन राजमुद्राची पूजन करण्यात आले…
* गारद म्हणण्यात आले भोसले यांनी..
* ध्येय मंत्र एडवोकेट विठ्ठल शेळके यांनी म्हटले.
* त्यानंतर राष्ट्रगीत घेण्यात आली
शेवटी सगळ्यांची तोंड गोड करून कार्यक्रमाचा समारोप झाला..
* राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 101 रक्तदान घेण्यात आला.
* हजार लोकांचा नाश्त्याची सोय करण्यात आली होती याप्रसंगी खूप उत्साह सर्व शिवप्रेमी मध्ये पाहायला मिळाला.
* महोत्सव समितीकडून विशेष परिश्रम
शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडून या सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेण्यात आले होते तसेच सर्व नियोजन उत्कृष्ट पद्धतीने ते होते पूजनासाठी येणाऱ्या अठरापगड जातीतील जोडप्यांसाठी विशेष मस्त करण्यात आली होती तर प्रसादाचे देखील नियोजन करण्यात आले होते. तसेच पुढील वर्षी 501 जोडप्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचे पूजन करण्याची घोषणा देखील करण्यात आली..
* सोहळ्यातील विशेष…
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पुरूषोक्त ( मंत्रोपचार) बीड शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा परिवारातील मुली यांनी केले आहे. कुमारी स्नेहल कागदे, इशिका किशोर पिंगळे, साक्षी सोळुंके, तन्वी काळे, वैष्णवी कसपटे, गौरी शिरसागर यांच्याकडून मंत्रोपचार करण्यात आले हे लाक्षणिक ठरले आहे.
* 101 रक्तदात्यांनी केले रक्तदान!
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवतीर्थावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते यावर्षी 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आपले कर्तव्य बजावले आहे त्याबद्दल शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडून सर्वांचे स्वागत करण्यात आले आहे….